शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘भावांतर’ने धान्य उत्पादकांना भरपाई, ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:15 IST

मध्यप्रदेशातील वाढीव हमी भावामुळे भाव वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देजळगाव धान्य बाजारतही जाणवणार परिणामपावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - धान्य तसेच कडधान्यास सरकारकडून जाहीर झालेला हमी भाव खरेदीदारांनी न दिल्यास त्यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम आता सरकारच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मध्यप्रदेश सरकारने ‘भावांतर’ नावाची ही योजना सुरू केली असून यंदा जादा हमी भावदेखील जाहीर केल्याने गव्हाचे भाव वाढून त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही होणार असल्याचे संकेत व्यापा-यांनी दिले आहे. या योजनेमुळे धान्य उत्पादक शेतक-यांना दिलासा तर मिळणार आहे, मात्र ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.कृषी पिकासाठी सरकार हमी भाव जाहीर करते, मात्र प्रत्यक्षात शेतकºयास जाहीर झालेला भाव मिळत नसल्याचे बºयाच वेळा दिसून येते. त्यामुळे शेतकरी हमी भावापासून वंचित राहत असतो. यासाठी मध्यप्रदेश सरकारने धान्यासाठी ‘भावांतर’ योजना सुरू करून शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.शेतक-यांच्या खात्यात होणार फरक जमागव्हाचे मोठे उत्पादन व जळगाव जिल्ह्यातही गव्हाचा पुरवठा करणाºया मध्यप्रदेशात सरकार गव्हाला दोन हजार रुपये हमी भाव देत आहे. हा भाव जाहीर झाल्यानंतर शेतकºयांनी त्यांचा माल विक्रीसाठी नेला असता तेथे गव्हाला दोन हजार रुपये भाव न मिळता केवळ १८०० रुपयेच भाव दिला तर यातील २०० रुपयांची फरकाची रक्कम सरकार संबंधित शेतकºयाच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र यासाठी ज्या भावात माल विकला त्यांची पावती व सातबारा उतारा शेतकºयांस सादर करावा लागणार आहे. हमी भावापेक्षा जास्त भावाने विक्री झाली तर त्यावर सरकारचा काहीच आक्षेप राहणार नाही, हे विशेष.जळगाव जिल्ह्यात परिणाममहाराष्ट्रात गव्हाला प्रति क्विंटल १७३५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने जळगाव जिल्ह्यात बहुतांश गहू हा मध्यप्रदेशातून येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेशातील या योजनेचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश सरकार हमी भावच दोन हजार रुपये देत असल्याने व्यापारी त्या भावात खरेदी करतील तर साहजिकच किरकोळ बाजारात यंदा गव्हाचे भाव वाढण्याचे संकेत दिले जात आहे. सध्या जळगावच्या बाजारात जुन्या गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये आहेत, मात्र आता मध्यप्रदेशातील नवीन मालाची आवक वाढल्यानंतर यामध्ये वाढ होणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.....तर शेतक-यांना पावत्या मिळणार नाहीगव्हाचा दर्जा, बाजारात असलेले कमी भाव यामुळे व्यापाºयांना हमी भावात गव्हाची खरेदी करणे परवडणार नसल्याने ते त्या भावात माल घेणार नाही. तसेच हमी भावापेक्षा कमी भावात माल खरेदी केला तर कारवाईची भीती राहणार किंवा कमी भावात माल घेतला तरी त्याच्या पावत्या व्यापारी शेतकºयांना देणार नाही, अशीही शक्यता या योजनेमुळे आहे. परिणामी पावती शिवाय फरकाची रक्कमही शेतक-यास मिळणार नाही, असे जानकारांनी सांगितले.जळगावच्या बाजारपेठेत मध्यप्रदेशातून गव्हाची जास्त आवक असते. तेथे हमी भाव वाढवून देण्यासह ‘भावांतर’ योजना सुरू केल्याने त्याचा परिणाम होऊन गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

टॅग्स :JalgaonजळगावMarket Yardमार्केट यार्ड