शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धिप्पाड देहाची सहृदय माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 12:58 IST

गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय आणि तपकिरी रंगाचे आशियाई अशा चार रंगांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने या देशाला इंद्रधनुषी देश म्हणतात. या देशाचे वैशिष्ट्य असे की, जुलूम केल्याचा इतिहास ज्यांच्याविषयी आहे ते गौरवर्णीय आणि क्रांतीची ज्योत पेटवून मायभूमीवर पुन्हा जोमदारपणे पाऊल रोवणारे कृष्णवर्णीय यांचे वंशज हे एकविसाव्या शतकात एकत्र राहत आहेत. हिंसा, ...

गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय आणि तपकिरी रंगाचे आशियाई अशा चार रंगांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने या देशाला इंद्रधनुषी देश म्हणतात. या देशाचे वैशिष्ट्य असे की, जुलूम केल्याचा इतिहास ज्यांच्याविषयी आहे ते गौरवर्णीय आणि क्रांतीची ज्योत पेटवून मायभूमीवर पुन्हा जोमदारपणे पाऊल रोवणारे कृष्णवर्णीय यांचे वंशज हे एकविसाव्या शतकात एकत्र राहत आहेत. हिंसा, गुन्हेगारी, वर्णद्वेषाचे चित्र पुसण्यासाठी तेथील तरुण आता आटोकाट प्रयत्न करताना जाणवतात. फारसा पैसा त्यांच्याकडे नसला तरी लोक आनंदी आणि समाधानी आहेत.दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी तिथल्या माणसांविषयी असलेली भावना, कल्पना तेथे गेल्यानंतर पूर्णत: बदलली जाते, याचा अनुभव घेतला. याचे संपूर्ण श्रेय तिथल्या सहृदय, मनमोकळ्या माणसांना द्यावे लागेल. वर्णविद्वेषामुळे प्रचंड क्लेश, छळ, अपमान, भेदभाव, अन्यायाचे हलाहल पचवून ही माणसे सौजन्यशीलतेने पर्यटकांशी वागताना दिसले. संगीत हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव असून संगीताचे सूर कानावर पडताच त्यांचे पाय थिरकायला लागतात, मग आपण रस्त्यावर आहोत की, कुठे याचे भान त्यांना नसते. अनौपचारिकता हा त्यांचा आणखी एक गुण. परिचय असो अथवा नको, कुणी भेटले की, हसतमुखाने त्याचे स्वागत आफ्रिकन माणूस करतो. पुढाकार घेऊन विचारपूस करतो. हास्यविनोद करून पहिल्या भेटीतील वा परिचयातील अवघडलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करतो.नेल्सन मंडेला हे त्या देशाचे आणि देशवासीयांचे दैवत आहे. त्यांचे पुतळे, स्मारके, प्रतिमा ठिकठिकाणी दिसून येतात. कृष्णवर्णीयांवर झालेल्या अत्याचाराची स्मृतीशिल्पे उभारून त्यांनी पूर्वजांविषयी आठवणी, त्यांच्या वेदना जिवंत ठेवल्या आहेत. सर्व अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले गेले होते. कोणताही आर्थिक व सामाजिक हक्क बजावण्याला मनाई होती. जमिनी, घरे सोडायला भाग पाडून त्यांना झोपडपट्टीत कोंबण्यात आले. त्या वस्तीत अक्षरश: काडेपेटीसारख्या घरांमध्ये ते राहत असत. अजूनही काही प्रमाणात या झोपडपट्ट्या आहेत. उर्वरित झोपडपट्ट्यांच्या जागी घरकुले उभारण्यात आली आहेत. या वातावरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.कृष्णवर्णीय महिलांची कष्ट करण्याची ताकद अलौकिक आहे. हॉटेलमधील वेटरपासून तर हेलिकॉप्टरमधील पायलटपर्यंत सर्व ठिकाणी त्या लिलया काम करतात. काळा-सावळा रंग, रेखीव आणि हसतमुख चेहरा, तेजस्वी डोळे अशा व्यक्तिमत्त्वाच्या या महिलांनी सौंदर्याची पाश्चिमात्य व्याख्या धुडकावून लावली. मॉडेल, अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्या चांगली कामगिरी करीत आहेत.हिंसा, गुन्हेगारी, वर्णद्वेषाचे चित्र पुसण्यासाठी तेथील तरुण आता आटोकाट प्रयत्न करताना जाणवतात. फारसा पैसा त्यांच्याकडे नसला तरी लोक आनंदी आणि समाधानी आहेत.त्यांच्या प्रगतीला अडथळे म्हणजे, प्रचंड गरिबी, रोगराई, शिक्षणाचा अभाव ही आहेत. परंतु त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती या लोकांमध्ये आहे. ९ राज्ये, ११ भाषा अशी वैविध्यपूर्ण भौगोलिकता आणि संस्कृती हे एक वैशिष्ट्य आहे.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :Jalgaonजळगाव