शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

६०० भाषांमध्ये झाले भागवत गीते भाषांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:52 IST

जळगाव : गीतेचा जो विस्तार आहे त्याचेच नाव श्रीमद भागवत महापुराण आहे. अत्यंत संक्षिप्त भाषेत केवळ ७०० श्लोकांमध्ये ते ...

जळगाव : गीतेचा जो विस्तार आहे त्याचेच नाव श्रीमद भागवत महापुराण आहे. अत्यंत संक्षिप्त भाषेत केवळ ७०० श्लोकांमध्ये ते सामावले आहे. तब्बल ६०० भाषांमध्ये श्रीमद भागवत गितेचे भाषांतर झाले आहे़ गिता असा ग्रंथ आहे जो आपल्याला पुरूषार्थी, ज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, भक्तीनिष्ठ बनवितो असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या आठव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. या कथा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सलग आठ दिवस अनेक भाविक या कथेचे श्रवण करण्यासाठी दूरवरून सागर पार्क येथे येत आहेत. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, खरबूज विळ्यावर पडले किंवा विळा खरबुजवर पडला तरी खरबुजच कापले जाणार आहे. संत महात्म्याशी संपर्क ठेवो अथवा संत महात्म्याच्या संपर्कात राहून कल्याण तर व्यक्तीचे होईल, असे ते म्हणाले.आपण वारंवार या संसाराच्या जन्म मृत्यूच्या चकरात पडत असतो. कारण आपण खरोखर घरगृहस्थीमध्ये इतके अडकले आहोत की याशिवाय दुसरा काही संसार आहे याचा विचार करायला देखील वेळ मिळत नाही. काही लोक तर केवळ आपली पत्नी, मुले आणि बँक बॅलन्स इतकाच विचार करतात. अशी त्यांची बुध्दी मारली गेली आहे. संसारात आपला मृत्यू आणि येणारा काळ देखील ते पाहू शकत नाही, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.भगवान जगन्नाथांच्या श्रीमुर्तीचे आगमनश्रीमद भागवत कथा महोत्सवाप्रसंगी सोमवारी जगन्नाथपुरी येथून भगवान जगन्नाथांची श्रीमूर्ती घेवून पाच ब्राह्मणांचे आगमन झाले होते. यावेळी भगवान जगन्नाथांचे भव्य स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर भगवान जगन्नाथांच्या मूर्तीची स्थापना करून पुष्पवृष्टीने अभिषेक करण्यात आला.सजीव आरासने वेधले विशेष लक्षश्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवात आठव्या दिवशी एका सत्रात भगवान नारद आणि प्रतू तर दुसऱ्या सत्रात भगवान श्री नाथजी यांची सजीव आरास साकारण्यात आली होती.अत्यंत हुबेहूब साकारलेल्या आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव