भडगाव तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:53 AM2019-11-25T00:53:00+5:302019-11-25T00:54:05+5:30

बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह एकूण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे

Bhadgaon taluka has 6 Gram Panchayat polls | भडगाव तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

भडगाव तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

Next
ठळक मुद्देबोरनार येथे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य जागांसाठी पोटनिवडणूकसरपंच आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह एकूण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे, तर भट्टगाव, लोणपिराचे, वडगाव बुद्रूक, पिंप्रीहाट, आंचळगाव, अंतुर्ली बुद्रूक या ठिकाणी प्रत्येकी एका सदस्याच्या जागेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. अशा एकूण ७ ग्रामपंचायतींच्या एकूण १२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
बोरनार येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. यासाठी मीना रवींद्र बोराडे व सुनंदा अंकुश बोराडे या २ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारी माघारीची तारीख २५ नोव्हेंबर आहे. ८ डिसेंबर रोजी मतदान तर ९ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दिली.

Web Title: Bhadgaon taluka has 6 Gram Panchayat polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.