प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि. जळगाव : सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साऱ्या शेतांमध्ये तुडुंब चिखल, साचलेले पावसाचे पाणी, अति पावसामुळे पिकांना कोंब येऊन त्यातून दुर्गंधी येऊ लागली अशाही परिस्थितीत भडगावच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी भोरटेक परिसरातील शेतांमध्ये पाहणी केली.येथून जवळच असलेल्या भोरटेक येथे तहसीलदार माधुरी आंधळे या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आल्या होत्या. याआधी गेल्या पंधरवड्यात सतत १४ तासांच्या धुवाँधार पावसामुळे (चंदनपुरी) भोरटेक येथील नाल्याचे पाणी व बरड भागाचे पाणी गावात व शेतशिवारात घुसले. गावात व शेतात घाण, चिखल झाल्याने तसेच शेतातच पीक सडून पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. चिखल व दुर्गंधी यातून मार्ग काढणे मोठे मुश्कील होऊन बसले आहे. त्यातच सडलेला चारा, खाली सर्प, विंचू यांचा रहिवास असल्याने जीव मुठीत घेत शेताची सफाई सुरू झाली आहे.भोरटेकचे तलाठी माने हे भोरटेक शिवारात पंचनामे करीत असताना तहसीलदार आंधळे, तालुका कृषी अधिकारी गोरडे गटविकास अधिकारी जाधव हे नुकसानीची पहाणी करण्यासाठी आले. सर्वत्र घाण, दुर्गंधी, चिखल हे सारे नजरेस दिसत असतानादेखील तहसीलदारांनी चिखल तुडवत घाण वास सहन करत आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या कामगिरीने उपस्थित बळीराजा भारावला नी प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द निघाला ‘अधिकारी पाहिजे तर असा...’
दुर्गंधी, चिखल तुडवत भडगाव तहसीलदारांनी केली पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:24 IST
सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साऱ्या शेतांमध्ये तुडुंब चिखल, साचलेले पावसाचे पाणी, अति पावसामुळे पिकांना कोंब येऊन त्यातून दुर्गंधी येऊ लागली अशाही परिस्थितीत तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शेतांमध्ये पाहणी केली.
दुर्गंधी, चिखल तुडवत भडगाव तहसीलदारांनी केली पिकांची पाहणी
ठळक मुद्देमहिला तहसीलदारांच्या धाडसाचे कौतुककाही ठिकाणी तर गुडघाभर पाणी अन् चिखल