शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भादली रेल्वे गेट भुयारी मार्ग येणार पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:09 IST

रेल्वे विभाग : भुयारी बॉक्स लवकरच बसणार, पुढील तीन महिन्यात काम पूर्ण होण्याचा विश्वास

नशिराबाद : रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा मार्ग येत्या दोन-तीन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हा रस्ता कायमस्वरूपी बंद होऊन शेतकऱ्यांना फेºयाच्या मार्गाने देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन त्याठिकाणी पर्यायी भुयारी मार्ग देण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे काम सुरू असून आता आॅगस्ट अखेरपर्यंत हे काम पूर्णत्वास येणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली गत कालखंडात गतिमान झाल्या होत्या यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘भादली रेल्वे गेट बंद झाल्यास शेतकºयांनी शेतात जायचे कसे? ’या मथळ्याखाली शेतकºयांची कैफियत मांडून उहापोह केला होता. शेतकºयांच्या समस्या रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या होत्या. हा रस्ता बंद झाल्यास शेकडो एकर जमिनीवर शेतकºयांना पाणी फिरावे लागणार होते. मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत दखल घेवून पर्यायी मार्ग दिला होता. मात्र या शेतकºयांना सुमारे दहा किलोमीटर अंतराचा फेरा करून शेतात जावे लागणार होते. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा त्याला विरोध केला होता. आहे त्याच जागेवरून भुयारी मार्ग व्हावा, पर्यायी रस्ता नको, यासाठी शेतकºयांनी आंदोलन केले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, योगेश पाटील यांच्यासह शेतकºयांनी आंदोलनाचे त्यावेळी नेतृत्व केले होते.रेल्वे प्रशासनाने शेतकºयांची भूमिका व समस्यांची दखल घेऊन आहे त्याच जागेवरूनच भुयारी मार्ग करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन स्थगित करून आनंद व्यक्त केला होता.गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. अजून किती दिवस लांबच्या मार्गाने शेतकºयांना शेतात जावे लागणार या विवंचनेत शेतकरीराजा आहे. दरम्यान, यासंदर्भात मार्च २०२०पर्यंत हा रस्ता पूर्णत्वास येवून भुयारी मार्ग खुला करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ललित बºहाटे यांनी माहितीच्या अधिकारात रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत काम पूर्णत्वास न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पर्यायी रस्त्याने शेतकºयांना सध्या ये-जा करावी लागत आहे. भुयारी मार्ग लवकर खुला झाल्यास शेतकºयांना सोयीचे होणार आहे.२२ बॉक्स तयारदरम्यान, भादली रेल्वे स्टेशन परिसरात एल. एच. एस. भुयारी मार्गासाठी सुमारे बावीस बॉक्स तयार करण्यात आले आहे. भुयारी मार्गासाठीची सुमारे ६० टक्के काम पूर्णत्वास आले असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.रेल्वे गेट बंद असले तरी शेतकºयांसाठी पर्यायी मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणावरून भुयारी मार्ग देण्याचे काम गतीशील असून येत्या अडीच ते तीन महिन्यात काम पूर्णत्वास येऊन भुयारी मार्ग कार्यान्वित होणार आहे. सुमारे साठ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये एल एच एस भुयारी बॉक्स टाकण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई येथून मोठी क्रेन आणावी लागणार आहे. रेल्वे रोड क्रेन येणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु आहे.- रोहित थावर,भुसावळ रेल्वे विभाग उप मुख्य अभियंता (निर्माण).

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव