शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कीटकनाशकांचा वापर करावा जपून

By ram.jadhav | Published: October 23, 2017 11:47 PM

शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़

ठळक मुद्देयोग्य प्रमाण गरजेचेएकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर वाढावाशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची

आॅनलाईन लोकमत, दि़ २४ - बी.डी.जडेजळगाव : भारतात सर्वाधिक रासायनिक कीड व कीटकनाशके वापरण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहे़ दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या रासायनिक औषधांचा कीड नियंत्रणासाठी वापर करीत आहेत़ औषधांचा हा वाढता वापर शेतकºयांसाठी तत्काळ घातक तर ठरतच आहे़, शिवाय नैसर्गिक चक्रालाही यामुळे बाधा निर्माण होत आहे़ तसेच रसायनांच्या अतिवापरामुळे भाजीपाला व इतरही सर्व पिकांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन बहुतेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे़ आजच्या घडीला शेतकºयांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज आहे़ विशेष करून द्राक्ष, डाळिंब, कपाशी व भाजीपाल्याची सर्व पिके यांच्यासंबंधी शेतकºयांनी खास काळजी घेण्याची गरज आहे़ शेतकºयांनी इतर एकात्मिक किड नियंत्रण पद्धतींचा वापर करून महागड्या औषधींचा खर्च कमी करायला हवा़ तसेच मानवी आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे़औषधांचा प्रकाऱ़़आॅर्गनो क्लोराईड, आॅर्गनो फॉस्फरस, पायरेथ्रॉईड, नेकेटोनॉईड, कारबॅमाईट्स तसेच स्पर्शजन्य व आंतरप्रवाही या प्रकारातील औषधांची निवड कीटकांच्या प्रकारानुसार करावी़ कोणतेही औषध वापरताना ते प्रमाणापेक्षा वापरू नये, आवश्यक असल्यास त्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधांचा योग्य वापर केला जावा़ शासनाकडून औषध विक्रेत्यांना व शेतकºयांनाही वेळोवेळी नियमितपणे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे़जैविक पद्धतींचा वापर जास्त करावा़़़एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा शेतकºयांनी वापर करावा़ तसेच जैविक पद्धतीने कीटक नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर करावा, निंबांळी अर्क, तंबाकू अर्क, गोमूत्र, कामगंध सापळे, पिवळे चिकट पुठ्ठे, सापळा पिके, प्रकाश सापळा इत्यादी पद्धतींचा वापर करावा़ तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसताच शेतकºयांना याबाबत जागृत करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे़ तसेच फवारणी करताना शेतकºयांनी भरउन्हात फवारणी करणे टाळावे, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला पूर्णपणे झाकून, हातमोजे, चष्मा किंवा हेल्मेट (सेफ्टी किट) इत्यादी साहित्याचा वापर अवश्य करावा़ शक्यतो संपूर्ण अंग झाकूनच कोणत्याही औषधांची फवारणी करावी़ फवारणीनंतर साबणाने स्वच्छ अंघोळ करणे गरजेचे आहे़घ्यावयाची काळजी़़एकच पीक पद्धती टाळावी, म्हणजेच पिकांची फेरपालट करणे, कीटकांचे जीवन चक्र तोडावे, लागवडीच्या वेळेत बदल करणे, खूप उशिरा लागवड करणे टाळावे, भौतिक, जैविक, यांत्रिक आणि रासायनिक अशा सर्व प्रकारच्या पद्धतींचा आलटून-पालटून वापर करावा़ तसेच स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो़ किडींच्या व कीटकांच्या प्रकारानुसार, योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करावा़ जसे, कीटकांच्या तोडांचा आकार, त्यांचा चावण्याचा प्रकार, रसशोषण करण्याची पद्धत, टोचण्याची पद्धत आदींचे बारकाईने निरीक्षण करून व किडींचा प्रकार ओळखूनच औषधांची निवड करावी़ जास्त औषधे एकत्र करू नयेत़़शेतकºयांनी किडींची ओळख पटल्यावर योग्य ते एकच औषधे वापरावे़ दोनपेक्षा जास्त कीटकनाशके एकत्र करून वापरू नयेत़ तसेच वेगवेगळ्या प्रकारातीलही अनेक औषधे एकाच वेळी एकत्र करून फवारणी करू नये़ एका वेळी एकच कीडनाशक व बुरशीनाशक वापरावे़औषधांवरील या चिन्हांचे निरीक्षण करून विषारी औषधांची तीव्रता तपासता येते़ गरजेनुसार यातील औषधांचा वापर करावा़