शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बेंचेस प्रकरण अखेर उच्च न्यायालयात नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 21:22 IST

जि.प. तील निविदेचा घोळ

ठळक मुद्देसीईओंना शिवसेना आज देणार नोटीसनिविदेतील दोन अटी आहे बेकायदेशीर
जळगाव : जिल्हा परिषदेने पॉलिमर बेंचेससाठी काढलेली ई निविदा बेकायदेशीर असल्याच्या आरोपासह या प्रक्रियेस विरोधकांनी हरकत घेऊनही दखल घेतली जात नसल्याने शिवसेना याप्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीस लागली आहे. ही निविदा प्रक्रियाच रद्द करून शासन निर्यणानुसार शालेय शिक्षण समित्यांना बेंचेस खरेदीसाठी थेट रक्कम द्यावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. या बेकायदेशीर निविदेच्या विरोधात न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वी 21 रोजी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, उपगटनेते पवन सोनवणे, नानाभाऊ महाजन आदींतर्फे नियमानुसार नोटीस दिली जाणार आहे. निविदा काढण्याल्याच हरकतशासनाच्या डीबीटी नियमानुसार वस्तू न देता थेट लाभधारकांना रक्कम वितरीत होणे गरजेचे असताना निविदा काढणेच चुकीचे आहे, असा आरोप असून शासन निर्मित शालेय समित्या या बांधकाम, शालेय पोषण आहार देखरेख, शिक्षक रजा व मेडिक्लेम आदी जबाबदा:या पार पाडत असताना त्यांनाच पैसे देऊन बेंच खरेदीचे अधिकार देणे उचित असताना निविदा काढून नियमाचे उल्लंघन केल्याचे मत विरोधकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेचीही मान्यता नाही50 लाखांच्यावर टेंडरला सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असताना या विषयास सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता थेट निविदा काढण्यात आली. याचबरोबर विषय समितीपुढेही हा विषय नियमानुसार आलाच नाही. एकूणच ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. निविदेतील दोन अटी आहे बेकायदेशीरई निविदेत असलेल्या क्रमांक 7 आणि 22 या दोन अटी बेकायदेशीर असल्याचे विरोधक असलेल्या शिवसेनेचे म्हणणे आहे. अट क्रमांक 7 मध्ये म्हटले आहे की, निविदाधारकांनी दिलेल्या निविदेत बेंचेसचे नमुने 20 एप्रिल 2018 र्पयत जमा करावे. यापैकी जे नमुने तपासणीत पात्र ठरतील, त्यांच्याच निविदा स्वीकारल्या जातील. अट क्रमांक 22 मध्ये म्हटले आहे की, निविदा धारकाच्या उत्पादन क्षमतेची चचाणी करण्यात येईल. या दोन्ही अटी पदाधिकारी आणि अधिका:यांच्या सोयीच्या असून या अटीनुसार ते हव्या त्या ठेकेदारास ठेका देऊ शकतात, त्यामुळे निविदेलाच अर्थ राहत नाही. या अटी बेकायदेशीर आहेत, असा आक्षेपही घेण्यात आला आहे.
टॅग्स :Jalgaonजळगाव