शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोणी तिकीट देवो की ना देवो नाथाभाऊच्या मागे पब्लिक- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:16 IST

राज्याच्या सर्वोच्च विधानसभा सभागृहात  पारदर्शकता मांडणारे भाषण करून विश्वासार्हता वाढली आहे.

रावेर - राज्याच्या सर्वोच्च विधानसभा सभागृहात  पारदर्शकता मांडणारे भाषण करून विश्वासार्हता वाढली आहे. सभागृहात व या महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलण्यासाठी धाडस लागते. पण शासनाच्या माध्यमातून कोणी एक शब्द बोलले नाही याची खंत वाटते. कुणाची आवडती वा नावडती राणी असते पण आपण राजा आहोत. एटीएस, आयकर विभागाच्या चौकश्या लावल्या. चोर्‍या केल्या की चपाट्या केल्या. एवढे भुक्कड आम्ही नाहीत. विखे पाटील आले तर या. या अन् आम्ही आलो तर चल फूट्टं. अरे कुणी तिकीट देवो की ना देवो ही पब्लिक नाथाभाऊंच्या मागे आहे.हितचिंतक म्हणतात तिथे राहू नका. एवढा अपमान सहन कशाला करता. अन् जर ही जनतेची इच्छाचं असेल तर जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. इथे काही कुणी कुणाचे धरले बांधलेले नाहीत एवढे असल्यावरही मी म्हणतो भाजपलाच जास्तीत जास्त  ४० हजार नव्हे तर ८० हजार मताधिक्याने विजयी करून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक द्या असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी चढवला. रावेर विधानसभा कार्यकर्त्यांच्या विस्तृत चिंतन बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले नाथाभाऊंची अवहेलना वा अपमान झाला असला तरी नाथाभाऊं पक्षासाठी काम करणार आहे.आजपर्यंत पक्ष व जनतेच्या विकासासाठी काम करीत आलो. वैयक्तिक स्वार्थासाठी किती कंपन्या व किती कॉलेजेस उघडता आले असते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी १३ महिन्यात किती कॉलेज उघडले? मात्र ते डोनेशन कमावणे आपल्याला जमत नाही अशी टीकाही त्यांनी केली. 

 महाराष्ट्रात काहीही होऊ द्या. या नाथाभाऊला बाहेर होवू द्या, तुम्हाला ते घरात घुसून मारतील.कारण कार्यकर्ते हीच नाथाभाऊंची ताकद आहे. आपल्या भागाचे नुकसान झाल्याचे शल्य आहे. आपल्या भागातील मंजूर झालेले इंजिनियरींग कॉलेज, हॉर्टीकल्चर कॉलेज गेले या नुकसानीचे शल्य आहे. एवढे झालेवरही मी म्हणतो भाजपल मत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. काय आम्ही चोरी - चपाटी केली की रंडीबाजी केली, जे करताय ते तुमच्यासोबत आहेत. अन्याय, अत्याचार झालेत.तरीही मी माझ्या वाढवलेल्या पक्षाचे झाडाला तोडणे मला आवडत नाही.म्हणून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना ४० हजारापेक्षा ८० हजाराचे मताधिक्य मिळवून पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना चपराक देत नाथाभाऊंची किंमत कळू द्या असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आमदार हरिभाऊ जावळे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि प सभापती सुरेश धनके, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, रावेर पं स उपसभापती अनिता चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजप तालूकाध्यक्ष सुनिल पाटील, माजी सभापती मिलींद वायकोळे, जि प सदस्य कैलास सरोदे, रंजना पाटील, नंदा पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे