शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

‘अंतर्नाद’तर्फे आजपासून पुष्पांजली प्रबोधनमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:16 IST

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.

ठळक मुद्देचिनावलला प्रथम पुष्प नाशिकचे अंबडकर गुंफणारयावलमध्ये द्वितीय पुष्प चाळीसगावचे मनोहर आंधळेरावेरमध्ये समारोप चांदवडचे विष्णू थोरे करणार

भुसावळ, जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.प्रथम पुष्प चिनावल (ता.रावेर) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २३ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिकचे हास्य कलावंत प्रमोद अंबडकर हे गुंफतील. ‘चाल दोस्ता तुला आपला गाव दाखवतो’ हा त्यांचा विषय आहे. चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर बोरोले अध्यक्षस्थानी असतील. विशेष अतिथी म्हणून कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे तर प्रमुख पाहुणे रावेर पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, सरपंच भावना बोरोले असतील.द्वितीय पुष्प यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगावचे साहित्यिक मनोहर आंधळे हे गुंफतील. ‘कविता बोलते युवकांच्या काळजाशी’ हा विषय ते मांडतील. प्राचार्य डॉ. एफ. एम. महाजन अध्यक्षस्थान भूषवतील. यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे प्रमुख पाहुुणे असतील.तृतीय पुष्प रावेरच्या सरदार जी.जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे २६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चांदवडचे कवी, गायक विष्णू थोरे हे गुंफतील. ‘जाणिवा समृद्ध करणाऱ्या गावशिवच्या कविता’ हा त्यांचा विषय आहे. रावेर शिक्षण हितवर्धक संस्थेचे चेअरमन प्रकाश मुजूमदार अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश धनके, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर महाजन, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, चोपड्याचे डॉ.विलास पवार, रावेर शेतकरी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील हे असतील.साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीलासाहित्यिकांशी ओळख व्हावी, वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठानने ही प्रबोधनमाला विद्यार्थी रसिक डोळ्यासमोर ठेवून सुरू केली आहे. श्रोत्यांपर्यत वक्त्याला घेऊन जाणे असा हा आगळा वेगळा उपक्रम आहे. यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदीप पाटील, संयोजक प्रा.डॉ.जतीन मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर घुले, प्रकल्पप्रमुख संजय भटकर हे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ