शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात बदलाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:39 IST

नवीन विद्यापीठ कायदा निर्मिती प्रक्रियेतील विशेष सल्लागार अनिल राव यांची माहिती

ठळक मुद्देस्टुडंट कॉन्सीलच्या निवडणुकांबाबत महिनाअखेरपर्यंत निर्णयाची शक्यतारोजाराभिमुख अभ्यासक्रमही लवकरच

सागर दुबेजळगाव : नवीन विद्यापीठ कायदा राज्यात अस्तित्त्वात आला असून या कायद्यामुळे उच्च शिक्षणात बदलाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती नवीन विद्यापीठ कायदा निर्मिती प्रक्रियेतील विशेष सल्लागार अनिल राव यांनी दिली.लोकमत कार्यालयाला त्यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.अनिल राव म्हणाले, नवीन विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी अस्तित्वात आला. त्यानंतर राज्यभरातील विद्यापीठामध्ये त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. अधिसभा (सिनेट), अकॅडमीक कॉन्सील (विद्या परिषद) व अभ्यास मंडळांच्या निवडणुका आटोपल्या आहेत. मात्र स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. लिंगडोह समितीने या निवडणुकांबाबत शिफारस केली आहे. या निवडणुकीची नियमावली तयार करण्याचे काम माजी कुलगुरु डॉ.आर.एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने तयार केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य शासन निर्णय घेण्याची शक्यता असून त्यानंतर निवडणुका होतील.प्रत्येक विद्यापीठात पूर्णवेळ चार अधिष्ठातांची नियुक्ती करण्यात यावी, अशी नवीन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे, मात्र याबाबत अद्याप शासनस्तरावर निर्णय झालेला नाही. याच महिन्यात यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. शासनाने मंजुरी दिल्यास ११ विद्यापीठांमध्ये ४४ अधिष्ठाता असतील.राज्यातील विद्यापीठांना आपल्या परिसरातील भौगोलिक व औद्योगिक परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम सुरु करता येतील. त्यासाठी यापूर्वीच अभ्यास करण्यात आला असून अभ्यासक्रमही तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार लवकरच स्कील कोर्सेस सुरु होतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने जीएसटीचा अभ्यासक्रम तयार केला असून खान्देशातील २३ महाविद्यालयामध्ये तो शिकविला जाईल.बृहत आराखड्याचेही काम दीड वर्षांपासून सुरु असून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास, समाजोपयोगी संशोधन, रोजगाराच्या संधी आदी मुद्यांवर भर देण्यात आला आहे, असेही अनिल राव यांनी सांगितले.आता विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभागनवीन विद्यापीठ कायदा हा विद्यार्थी केंद्रीत आहे. विद्यार्थ्यांशी संबधित मुद्यांवर आता विद्यार्थ्यांची मते विचारात घेतली जातील तसेच विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असणार आहे. स्टुडंट कौन्सीलच्या निवडणुकानंतर ३ महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असलेल्या अध्यक्ष व सचिवांना व्यवस्थापन परिषदेत बोलाविले जाईल. यापूर्वी विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग नसायचा. आता विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळणार असल्याचाही विश्वास अनिल राव यांनी व्यक्त केला.विद्यार्थी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित होणार...विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात येईल. महाविद्यालयीनस्तर, जिल्हा, विद्यापीठ स्तरावर तक्रार करता येईल. जनलोकपालही तक्रारीची दखल घेतील.शिक्षणाचा दर्जा उंचावणारअनिल राव म्हणाले, नवीन कायद्यानुसार महाविद्यालयांना स्वायत्तताही मिळणार आहे. ती मिळाल्यानंतर संबधित महाविद्यालयांना अभ्यासक्रम तयार करता येईल व परीक्षा घेता येईल मात्र निकाल विद्यापीठ देईल. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांना सॅटेलाईट सेंटर उभारता येईल. तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दुर्गम भागात जून २०१९ मध्ये उपकेंद्र सुरु होतील.

टॅग्स :universityविद्यापीठJalgaonजळगाव