शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण!

By अमित महाबळ | Updated: July 17, 2023 19:44 IST

जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत.

जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या कामांची ३०० ते ३५० कोटी रुपयांची बिले अडकून पडल्याने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेल्या मक्तेदारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व निषेध आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ जळगाव शाखा, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, जळगाव शाखा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. 

मागील दोन वर्षांपासून मक्देरांची बिले अडकून पडली आहेत. आंदोलन, उपोषण केले म्हणजे सरकार थोडीफार रक्कम देते पण संपूर्ण रक्कम मात्र, वळती केली जात नाही. जळगाव जिल्ह्यातील मक्तेदारांचे ३०० ते ३५० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकून पडले आहेत. राज्यात हीच रक्कम १४ हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे थकबाकी मिळावी म्हणून राज्यात एकाच दिवशी उपोषण केले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, जळगाव शाखेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली.  बँकांचे थकबाकीदार ठरले

जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत. बिले निघत नसल्याने बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित झाले आहेत. त्यांची वाहने जप्त झाली आहेत. जीएसटी व आयकर (आयटी) विभागाच्या रकमा भरू शकत नाहीत. या आर्थिक संकटामुळे ते व्यवसायातून बाहेर निघाले आहेत. शासनाने मक्तेदारांच्या समस्येचा विचार करून थकित बिले अदा करावीत, अशी मागणी विलास पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव