भुसावळ : कोरोनापासून वाचण्यासाठी जनतेने स्वार्थी व्हायला पाहिजे. म्हणजेच स्वत: व परिवारातील सदस्यांना विनाकारण घराबाहेर निघू देऊ नका, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले.शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुभार्वावर चर्चा व तोडगा काढण्यासंदर्भात जय गणेश फाउंडेशनतर्फे शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात ते बोलत होते.शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन त्यास प्रतिबंध घालण्यासाठी काम करतेच आहे. परंतु सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा त्यास हातभार लावला पाहिजे. सर्वसामान्य जनता ह्या काळातील आपल्या समस्या व भावना अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहचवू शकत नाही त्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत पोहचवणे व प्रशासनाच्या अडचणी समजून घेऊन लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.यावेळी शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, अखिल भारतीय जैन संघटनेचे प्रेम कोटेचा, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नाना विसपुते, बांधकाम मटेरियल संघटना अध्यक्ष प्रिन्सी गुजराल, सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई चुडीवाले, नाट्यकर्मी वीरेंद्र पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे जी.आर.ठाकूर, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष विलास चौधरी, अंतर्नाद प्रतिष्ठानचे जीवन महाजन, रोटरी रॉयल्सचे राजेंद्र यावलकर यांनी चर्चासत्रात भाग घेऊन विविध समस्या व उपाय सांगितले.समस्या ऐकून घेतल्यानंतर विभागीय पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले, पोलीस प्रशासन यापुढे कडक बंदोबस्त करणार आहे. त्यामुळे कुणीही पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने मर्यादा येतात. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनास मदत केली पाहिजे.सूत्रसंचालन व प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण मांडळकर यांनी केले.र यशस्वीततेसाठी जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुषार झांबरे, राहुल भावसेकर, हर्षल वानखेडे, खेमचंद्र भंगाळे आदी पदाधिकाºयांनी प्रयत्न केले.
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्वार्थी व्हा -गजानन राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 18:00 IST
कोरोनापासून वाचण्यासाठी जनतेने स्वार्थी व्हायला पाहिजे. म्हणजेच स्वत: व परिवारातील सदस्यांना विनाकारण घराबाहेर निघू देऊ नका, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले.
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्वार्थी व्हा -गजानन राठोड
ठळक मुद्देभुसावळ येथे कोरोना निर्मूलनासंदर्भात बैठकीत मार्गदर्शनखरोखर कामाशिवाय बाहेर पडू नका