शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रावेर शहराला दंगलीकडून मांगल्याकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:51 IST

रावेर : शांतता समिती सभेत नुतन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे

रावेर, जि.जळगाव : शहराला लागलेला दंगलीचा डाग आपल्या नागरिकत्वाचे भान ठेवून व दुरोगामी परिणामांची जाण ठेवून सण उत्सव शांततेत व काळजीपूर्वक साजरे करा. रावेर शहराला दंगलीकडून मांगल्याकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहा, असे प्रतिपादन नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले. रावेर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, निवासी नायब तहसीलदार कविता देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, नगरसेवक असदुल्ला खान, महावितरणचे कििनष्ठ अभियंता योगेश पाटील, रवींद्र महाजन, फौजदार दीपक ढोमणे यांचे पोलिस स्टेशनतर्फे स्वागत करण्यात आले. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांची बदली झाल्याने नगराध्यक्ष दारा मोहंम्मद यांच्याहस्ते त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी मनोगतात अ‍ॅड.एम.ए.खान यांनी शहराच्या जातीय सलोख्याचा गौरव करून पोलिस स्टेशन आपण दुसऱ्याच्या निर्णयातून नव्हे तर स्वयं निर्णयातून पोलीस ठाणे चालवण्याची मागणी केली. पिंटू महाजन यांनी नागझिरी विसर्जन कुंडाची स्वच्छता करण्याची सुचना केली. मुस्लिम पंच कमिटीचे गयास शेख यांनी मिरवणूक मार्गावरील वीज संयोजन व केबल नेटवर्कच्या वायरींची उंची उंचावण्याची मागणी केली. मुख्याधिकारी रवींद्र लांडे म्हणाले सण उत्सवातील प्रेरणा महत्वाची आहे. दंगलीची ओळख मिटण्याची तमाम नागरीकांची जबाबदारी आहे. गणेशोत्सव व मोहर्रम सणानिमित्त सोयीसुविधांची उपाययोजना करण्यात येतील.यापुढे बोलताना पोलीस वाकोडे म्हणाले, गुंडांवर वचक ठेवण्यासाठीच पोलीस असून जेजुरी पोलिसात गुंडांवर मोक्का लावणारा पहिला अधिकारी असून गुन्हेगारी शून्यावर आणण्यात यश आणल्याचे स्पष्ट करून गुंडांबाबत माहिती द्या. त्यांच्यावर वचक आणण्याची आमची जबाबदारी आहे. गुन्हेगारी जगताकडे वळणारी मुलांना परावृत्त करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, गयास शेख, युसूफ खान दिलीप कांबळे, नगरसेवक सुधीर पाटील, सादीक शेख, अ‍ॅड.योगेश गजरे, राजेश शिंदे, अ‍ॅड.लक्ष्मीकांत शिंदे, श्रीकांत भोकरीकर, डी.डी.वाणी, डॉ.संदीप पाटील, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, अश्फाक शेख, गोपाळ चौधरी, एमआयएमचे वसीम शेख, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. आभार फौजदार दीपक ढोमणे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर