शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूमचा वास येतो, पाणी जास्त टाकत जा! बोलल्याचा राग येऊन सख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 19:48 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : ५० हजार रूपयांचा ठोठावला दंड ; पाचोरा पोलिसात होता गुन्हा दाखल

जळगाव- बाथरूमचा वास येतो, जास्त पाणी टाकत जा! असे बोलल्याचा राग येवून दीपक रामा निकम (वय-३६, रा़ हनुमाननगर, पाचोरा) यांचा मोठ्या भावाने खून केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालायाने मंगळवारी निकाल दिला असून त्यात आरोपी रावसाहेब रामा निकम (वय-४४, रा़ पाचोरा) याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावून ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.दीपक निकम हे पत्नी व मुलासह पाचोरा येथे वास्तव्यास होते़ दरम्यान, १७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास पत्नी गावाला गेली असल्यामुळे दीपक व त्यांचा मुलगा असे दोघे घरी होते़ त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ रावसाहेब निकम हा घरात आला व दोघांमध्ये बाथरूचा वास येतो या कारणावरून वाद झाला़ त्यानंतर दीपक यांनी मोठ्या भावास जास्त पाणी टाकत जा! असे सांगितले असता त्याचा राग आल्याने साहेबराव याने सुºयाने दीपक यांच्या पोटासह छातीवर वार करून गंभीर जखमी केले़ नंतर दीपक यांना जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ परंतू, १९ एप्रिल २०१७ रोजी त्यांचा उपचार घेत अखेर त्यांची जीवनज्योती मालवली. त्यानंतर याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.१७ साक्षीदार तपासलेगुन्ह्याचा तपास पोलीस निरिखक नवलनाथ तांबे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे यांनी केल्यानंतर पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी न्यायालयात खूनप्रकरणी दोषापत्र दाखल केले़ त्यानंतर खटला हा न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात चालला़ याप्रकरणी सरकारपक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले़ त्यात मयताचा मुलगा निखील तसेच पत्नी संगिता, वहिनी अनिता तसेच डॉ़ अर्जुन सुतार, डॉ़ सचिन इंगळे, दाखल अंमलदार, पोलीस उपनिरिक्षक आऱआऱभोर, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलीस निरिक्षक नवलनाथ तांबे यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.अन् जन्मठेपेची सुनावली शिक्षासरकारपक्षातर्फे अ‍ॅड. वैशाली एस़महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद करून सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्यांच आधार घेतला व सख्या भावाचा खून करण्याचे केलेले कृत्य हे माणूसकीला काळीमा फासणारे आहे, असाही युक्तीवाद केला. त्यानंतर मंगळवारी न्या़ एस.जी. ठुबे यांनी निकालाअंती आरोपी रावसाहेबर रामा निकम यास दोषी धरून भादवी कलम ३०२ खाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला़ दरम्यान, दंडातील रक्कमेतून ४५ हजार रूपयांची रक्कम ही मयत दीपक यांच्या पत्नीस देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे़ आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव