शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बारामती पालिका जिंकण्याबाबत मागे हटणार नाही : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:19 IST

अजित पवार यांचे वक्तव्य बालीशपणाचे

जामनेर, जि.जळगाव : जळगाव, धुळे महानगरपालिकेत भाजपला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले असून अहमदनगरची सत्ता भाजपकडे आहे. कामाच्या जोरावर भाजपची सर्वत्र विजयी आगेकूच सुरु आहे. बारामती पालिका जिंकण्याचे ध्येय आहेच, त्यात गैर काहीही नाही. पक्षाने आदेश दिल्यास मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी जामनेरात मांडली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत सहभागी नेत्यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर चौफेर टीका केली. महाजन यांनी बारामती पालिके संदर्भात केलेल्या विधानाबाबतदेखील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी टीका केली होती.जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार नाहीराष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी सांगितले की, मतदारांमध्ये राष्ट्रवादीला जनाधार राहिला नसल्याने या पक्षाचे नेते बिनबुडाचे आरोप करीत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बालीश आरोप करावे, याचेच आश्चर्य वाटते, अशी टिप्पणीही महाजन यांनी केली. ते पुढे म्हणाले की, राज्यात विरोधी पक्षांची स्थिती वाईट असून मतदारांमध्ये त्यांना विश्वासार्हता राहिलेली नाही. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. सरकारवर खोटे आरोप करुन मतदान मिळत नसते, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असेही आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले.मतपत्रिकेद्वारेही मतदार विरोधकांना नाकारल्याशिवाय राहणार नाहीइव्हीएमबद्दल बालीश आरोप पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करावे याचेच आश्चर्य वाटते. इतरांच्या आरोपांची दखल घेण्याइतपत ते मोठे नाही. कोणत्याही निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घ्या, मतदार तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चुकीची माहिती देऊन दिशाभूल करु नकाजामनेर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल विरोधक करीत आहेत. यंदा कमी झालेल्या पावसामुळे टंचाई जाणवेल, मात्र सद्यस्थितीत तालुक्यात एकही टँकर सुरु नसताना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिशाभूल करणारे विधान विरोधक करीत असल्याने त्यांच्यावर मतदारांचा विश्वास नसल्याचेही महाजन म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव