शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 15:18 IST

गेल्या तीन दिवसांपासून वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवहार इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. बँक कर्मचारी व ग्राहकदेखील कमालीचे वैतागले आहेत.

ठळक मुद्देइंटरनेट सेवा खंडित झाल्याने निर्माण झालीय समस्याग्राहकांसह सर्वच वैतागले

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवहार इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. बँक कर्मचारी व ग्राहकदेखील कमालीचे वैतागले आहेत.सर्वच व्यवहार बँकेमार्फत होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांचे अर्थचक्र थांबले आहे. उलाढाल करण्यासाठी खात्यातून रक्कम काढायला गेले असता इंटरनेट सेवेच्या वारंवार खंडित होण्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांना भोगावा लागत आहे.वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची ग्राहक संख्या जवळजवळ ११ हजार आहे. २२ ते २५ खेड्यातील जनता या बँकेशी संलग्न असल्याने त्यांचा पुरता हिरमोड होत आहे.जळगाव ते चांदवड रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बी.एस.एन.एल. केबल वारंवार तुटून सेवा देताना व्यत्यय येत आहे. यामुळे दैनंदिन होणारे लाखोंचे व्यवहार तीन दिवसांपासून पूर्णत: शट डाऊन झाले आहेत. शासन एकीकडे पेपरलेस व्यवहाराला महत्त्व देत असले तरी यावरदेखील या इंटरनेट सेवेच्या खंडित होण्याने परिणाम होत आहेत.वास्तविक बँक आॅफ महाराष्ट्र शाखा वरखेडीतर्फे बँकेच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आलेला आहे की, ‘इंटरनेट सेवा खंडित असल्यामुळे बँकेचे व्यवहार बंद आहेत. असुविधेबाबत क्षमस्व’ असा सूचनाफलक असतानाही ग्रामीण भागातील जनता थेट बँक कर्मचाऱ्यांशी संभाषण करून मोठ्या अपेक्षेने विचारणा करीत असते. व्यवहार केव्हा सुरू होतील. परंतु दिवसभर बँक कर्मचारीदेखील या सर्वांना समजून समजून बेजार होत आहेत.बी.एस.एन.एल.अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांचेदेखील मोबाइल हे बी.एस.एन.एल. सेवा युक्त असल्यामुळे त्यांच्याशीही संपर्क साधता येत नसल्याने आणखीनच भर पडली आहे.तसेच याठिकाणी येणाºया तमाम बँक ग्राहकांची अपेक्षा आहे की, बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बँक शाखेचा लाभ आर्थिक व्यवहार करताना व्यत्यय येणार नाही व पैशांअभावी लोकांची कामे खोळंबणार नाहीत. कारण सध्या शेती हंगामाचे दिवस असून शेतकरी वर्गास पैशांची नितांत आवश्यकता भासत असते.

टॅग्स :FarmerशेतकरीPachoraपाचोरा