लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : तालुक्यातील उमरखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकावर देवळी व आडगाव दरम्यान चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान घडली. जखमी शाखा व्यवस्थापकांना तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.प्राप्त माहिती अशी की, उंबरखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी काळकर हे चाळीसगाव उमरखेड येथे बँकेत जात होते. देवळे व आडगाव या गावांच्या दरम्यान चार तरुणांनी मोटारसायकलवर येऊन त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. यात त्यांच्या हाताला जबर मार लागला असून हाताची नस कापली गेली आहे. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. या प्रकारानंतर हल्लेखोर तरुण पळून गेले. घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
उमरखेड येथे बँक व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 15:39 IST
उमरखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकावर देवळी व आडगाव दरम्यान चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान घडली.
उमरखेड येथे बँक व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला
ठळक मुद्देचाळीसगाव मालेगाव रस्त्यावरील घटनाचार तरुणांनी केला चाकूहल्लाहाताला जबर मार बसून नस कापली