शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसऱ्या दिवशी मिळतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:01 AM

शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँक चोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात.

ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील खातेदारांचे हालक्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँकचोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात. यामुळे तालुक्यातील खातेदारांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.चोपडा शहरासह तालुक्यातील या सर्व बँकांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात आर्थिक व्यवहार आणि उलाढाल बघता येथे शाखा स्थापन केल्या आहेत. मात्र खातेदारांना धनादेशाद्वारे जर पैसे दुसºया बँकेतून आपल्या खाती वर्ग करायची असतील तर त्यासाठी येथील स्टेट बँकेत अथवा एचडीएफसी बँकेत धनादेश क्लिअरन्स हाऊस असणे अत्यावश्यक आहे. असे असताना हे हाऊस येथे स्टेट बॅँकेच्या शाखाही सुरू करीत नाही आणि एचडीएफसी बँकेला ही असे केंद्र सुरू करण्यासाठी ना हरकत स्टेट बँकेकडून दिली जात आहे म्हणून धनादेश वटायला तिसरा दिवस उजाडतो. त्यामुळे बँक खातेदाराला त्याचे पैसे असल्यावरही ताटकळत थांबावे लागते. धनादेश जमा केल्यानंतर तिसºया दिवशी ते पैसे उपयोगात येतात आणि क्लिअरन्स हाऊस असले तर विशिष्ट वेळात सर्व बँकांचे प्रतिनिधी एकाच ठिकाणी येतील व तिथल्या तिथे प्रत्येक बँकेला आज देणे किती व घेणे किती हे समजणार आहे आणि त्यावर प्रत्येक बँकेला आपल्या तिजोरीत किती पैसे असणार किंवा किती पैसे कमी पडतात हे समजू शकेल. पुढील व्यवहाराला ते सोयीस्कर होणार आहे. म्हणून धनादेश क्लिअरन्स हाऊस येथे स्थापन होणे गरजेचे आहे. स्टेट बँक सोडून इतर दुसºया म्हणजे केवळ एचडीएफसी बँकेतही हे हाऊस स्थापन करता येते मात्र त्यासाठी येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचे त्याबाबत एनओसी (हरकत नसल्याचे पत्र) लागते. अर्थात हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत, असेही समजले आहे. मात्र सर्वात अग्रेसर बँक म्हणून एसबीआय बँकेला हे हाऊस असते. एसबीआयच्या विभागीय कार्यालयाने केंद्र सुरू करायचे की नाही ठरवायचे असते. येथील एचडीएफसी बँकेतील शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाकडे एनओसी मिळावी यासाठी लेखी मागणी केली असल्याचे समजले आहे. मात्र त्यांना एनओसी पत्र किंवा आम्ही सुरू करतो, असे काहीच दिले जात नसल्याचे समजले आहे.शहरात सहकारी, नॉन शेड्यूल्ड, शेड्यूल्ड आणि राष्ट्रीयकृत अशा एकूण विविध प्रकारच्या १९ बँकांनी चोपड्यात पदार्पण केले आहे. त्यात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, देना बँक, सेंट्रल बँक, जिल्हा बँक, धरणगाव अर्बन बँक, जळगाव पीपल बँक शाखा, चोपडा पीपल बँक, क्सिस बँक, शिरपूर पीपल बँक, आयसीआयसीआय बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, हिंगोली पीपल बँक यासह इतर बँकेच्या शाखा सुरू झाल्या आहेत.आरबीआयची परवानगी लागते. आरबीआयच्या निर्देशानुसार दोनच बँक हे हाऊस सुरू करू शकतात. एक म्हणजे एसबीआय बँक आणि दुसरी बँक एचडीएफसी बँक. मात्र एचडीएफसीला स्टेट बँकेने एनओसी न दिल्याने सध्या प्रत्येक बँकेच्या काऊंटरवरच ही प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक बँकेला यासाठी एक व्यक्ती शहरातील व तालुक्यातील सर्व बँकांमध्ये धनादेश क्लिअरन्ससाठी पाठवावे लागते.सर्वसाधारणपणे सरासरी एका दिवसात एका बँकेत नोटबंदी आधी केवळ १५ ते २० धनादेश येत होते. नोटबंदीनंतर मात्र धनादेशाद्वारे व्यवहार करणाºया खातेदारांची संख्या एका दिवसाला सरासरी ६० ते ७० च्या वर गेली आहे. एवढी संख्या सर्वच बँकेत असते म्हणून सर्व बँक खातेदारांना जर त्याच दिवशी पैसे वापरता यावेत असे बँकांना वाटत असेल तर क्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे आहे. अन्यथा खातेदारांच्या ठेवींवर चालणाºया बँका खातेदारांचे हित कितपत जोपासतात अशी शंका निर्माण होऊ शकते.आता क्लिअरन्स हाऊस ही संकल्पना जुनी झाली आहे. त्याही पुढील प्रक्रिया म्हणजे धनादेश क्लिअर होण्यासाठी देशभर चार केंद्र सुरू होणार आहेत. धनादेश स्कॅन करून मुंबई येथे पाठविला जाईल आणि त्याच क्षणी संबंधित व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होतील.-रामेश्वर कदम, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, चोपडा

टॅग्स :bankबँकChopdaचोपडा