भुसावळ : तालुक्यातील वेल्हाळे गावातील प्रकल्पग्रस्तही बंदमध्ये सहभागी झाले आहेत.भारत सरकारने २ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांची मागणी मान्य न करता तीन शेतीविरोधी कायदे संमत केले. त्यामुळे कृषी उत्पन बाजार समितीसह रेशन व्यवस्था उद्ध्वस्त होईल. होऊनकेलेले शेतीविरोधी कायदे मागे घ्यावे यासाठी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहे. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.वेल्हाळे गावातील 'राख बांधीत प्रकल्पग्रस्त शेतकरी', शेतमजूर, युवक, लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते सकाळी वेल्हाळे गाव दरवाजाजवळ जमले. मंगळवारी वेल्हाळे बंद होते.या आंदोलनात हेमंत पाटील, किशोर पाटील, राजू राणे, पुरुषोत्तम (गोटू ) पाटील, सतीश पाटील यांच्यासह लोक संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
बंदला प्रकल्पग्रस्त वेल्हाळेवासीयांचाही पाठिंबा, गावात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 11:39 IST