शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर- यावल तालुक्यातील केळीपट्ट्यात पाण्याअभावी केळी लागवड रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:35 IST

भूगर्भातील पाण्याची कमालीची खालावलेली पातळी आणि मृग नक्षत्र अर्धे उलटूनही पावसाचा नसलेला पत्ता या मुळे रावेर- यावल तालुक्यातील केळीचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या भागात केळी लागवड रखडली असून केळी उत्पादकांनी सावध पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देपाणी पातळीत कमालीची घट झाल्याने ३५ टक्के केळी लागवड रखडलीजोरदार पावसाच्या आगमनाची सर्वत्र प्रतिक्षाकेळी बेणे (खोडे) खोदणाºया मजुरांवर सुद्धा मंदीचे सावट

आॅनलाईन लोकमतचिनावल ता. रावेर, दि.१२ : रावेर- यावल तालुक्यातील केळी पट्ट्यात भू-गर्भातील पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने अजूनही ३५ टक्के केळी लागवड रखडली आहे.मार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रचंड उन्हामुळे परिसरातील पाण्याची पातळी अधिकच खालावल्याने केळी उत्पादकांनी यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणारी केळी लागवड थांबवून धरली होती. अपेक्षेप्रमाणे पाण्याची पातळी खोल-खोल जात असल्यावर सुद्धा परिसरात केळी रोपे व बेणेची ६० ते ६५ टक्के लागवड उत्पादकांनी केली आहे. ती भविष्यातील पावसाळ्यात भूगर्भात पाण्याची वाढ होऊ शकते, या आशेवर. मात्र येणारा काळच ते ठरविणार आहे. तर काही केळी उत्पादकांनी सावध पवित्रा घेत अजूनही केळी लागवड केलेली नाही. त्याचप्रमाणे बागायती कपाशीची सुद्धा पेरणी अद्याप केलेली नाही. पाणी उपलब्धतेच्या सांशकतेने उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात आहे. कोणत्या शेतात काय लावावे व पेरावे हे सर्वस्वी पाण्यावर अवलंबून असल्याने या आठवड्यात जोरदार पावसाच्या आगमनाची सर्वत्र प्रतिक्षा होत आहे. यंदा टिश्यु केळी रोपाची प्रचंड झालेली बुकींग व सर्व उत्पादकांचा रोपे लावण्यावर भर असल्याने परिसरातील केळी बेणे (खोडे) खोदणाऱ्या मजुरांवर सुद्धा मंदीचे सावट आहे. केळी बेणे खोदणीत मजुरांना चांगल्या प्रमाणात मजुरी मिळते. मात्र यंदा लागवडीत झालेली घट, त्यातच रोपे लावण्याकडे शेतकºयांचा असलेला कल बघता मजुरांवरही कुºहाड कोसळल्यागत आहे. एकंदरीत शेतकरी व मजुरावरही एक प्रकारे मंदीचे सावट पसरले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी