शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मागणी नसल्याच्या कांगव्याने केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:45 IST

रोज ७०० ट्रक मालाची होते निर्यात : व्यापाऱ्यांची मक्तेदारी झुगारण्यासाठी कारवाईची मागणी

किरण चौधरीरावेर : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या प्रथमच उत्तर भारतात केळीला मागणी वाढल्याने रोज ५०० ते ७०० ट्रक केळीची निर्यात होऊ लागली आहे. मात्र मागणी नसल्याच्या नावाखाली लॉकडाऊनमध्ये व्यापाºयांनी सुरू केलेली अवघ्या ४५० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दरातील केळी मालाची लूट आजतागायत सुरूच आहे.केळी व्यापाºयांच्या या मक्तेदारीसमोर असंघटित केळी उत्पादक शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शासनाची कृषी, पणन व सहकार विभागाची यंत्रणा चाळ बांंधून केळी व्यापाºयांच्या दावणीला बांधली गेल्याची संतप्त भावना समाजमनातून उमटत आहे.आता तापमानातील घसरण केळी मालाची परिपक्वता होण्यास विलंब होत असल्याने केळीमालाची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. परिणामत:मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण होऊनही वाढत्या नफेखोरीच्या जडलेल्या सवयीमुळे केळी व्यापारी आजही बाजार समितीच्या भावापेक्षा कमी दरात केळीमालाची कापणी करीत असल्याने केळी उत्पादकांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.रावेर तालुका हा केळीबागायतीचे आगार आहे. गतवर्षी दुष्काळाची झळ व उष्णतेच्या लाटेची होरपळ सहन करावी लागली होती. तर यंदा मार्च महिन्यातील कोरोनाचा भस्मासूर घुसल्याने व्यापाºयांना लॉकडाऊनमध्ये अडीअडचणी आल्या होत्या. शासनाने त्या निस्तारल्याही होत्या. पण त्या प्रतिकूल परिस्थितीचा केळी व्यापाºयांनी आजतागायत बागुलबुवा करून प्रतिक्विंटल एक हजार ते दीड हजार रु भावाची अपेक्षा असताना ४५० ते ६०० रु अशी केळी बाजारभाव समितीच्या भावापेक्षा १५० ते २०० रु कमी दराची (रेंज) अभिसीमा बांधून केळी घेतली जात आहे.पालकमंत्र्यांकडून अपेक्षाआपत्ती व्यवस्थापनात शासन यंत्रणा व्यापाºयांच्या झुंडशाहीविरुध्द काहीतरी दंडूका उगारेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून केळी उत्पादकांवरील होणारा अन्याय व अत्याचार दूर होईल अशा भाबड्या आशा केळी उत्पादकांच्या उराशी असताना मात्र व्यापाºयांच्या मक्तेदारीला चाप बसू शकत नाही. मध्यस्थ व्यापारी यंत्रणा वठणीवर आणण्यासाठी कायदेशीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जम्मू आणि काश्मीर सह उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दररोज ६०० ते ७०० ट्रक केळी रवाना होत आहे. अर्थात एकीकडे बाजारपेठेत मोठी मागणी असताना तथा शिवारात केळी मालाची उपलब्धता कमी प्रमाणात आहे. बाजार भाव समितीच्या भावापेक्षा आॅनने पदरात पडणे गरजेचे असताना त्या बाजारभावापेक्षा २०० ते २५० रुपये कमी दराने केळीची लूट करण्यासाठी व्यापारी चटावल्याची केळी उत्पादकांत भावना आहे. तथापी, तापमानाची घसरण, वादळाची झालेली शांतता असे हवामानाचे धोके निस्तारल्याने केळी उत्पादकांनीही आता थोडी चढ्या भावांसाठी ‘आफ्टर दी ब्रेक’ ची उसंत घेतल्याचे चित्र आहे.७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती राष्ट्रात निर्यात..!केळीबाजार भाव समितीच्या घोषित भावापेक्षा जास्त दरात फळ निगा तंत्राखालील गुणात्मक व निर्यातक्षम केळी मालाची गत वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के निर्यात आखाती राष्ट्रात झाली आहे. आजपावेतो ७०० ते ८०० कंटेनर केळी निर्यात झाली असण्याचा अंदाज रूची एक्सपोर्टचे संचालक विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला. किंबहुना, स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी केळी निर्यात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण पश्चिम बंगालमधून आलेल्या तंत्रकुशल कामगारांकडून दिल्याने तालुक्यात आता ४०० ते ५०० तंत्रकुशल केळी निर्यातीचे कामगार उपलब्ध झाल्याची सकारात्मक बाब त्यांनी स्पष्ट केली.शासनाने पिळल्या जाणाºया केळी उत्पादक व सामान्य ग्राहकांना संरक्षण मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार व पणन महामंडळ, केंद्र शासनाचा सांख्यिकी विभाग, शेतकरी, केळीत व शासनप्रतिनिधी नियुक्त करून नफेखोरीला आळा घालण्यासाठी कायमचा प्रतिबंध करण्याची गरज आहे- डॉ.के.बी.पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ, जळगावकेळीमालाची वाढती मागणी व केळी मालाची उपलब्धता घटल्याने तथा हवामानाचे धोके टळल्याने केळी उत्पादकांनी चढ्या भावासाठी विश्राम घेतला असला तरी, केळीमालाची जास्त प्रमाणात परिपक्वता देणेही धोक्याचे असल्याने केळीमाल संचित होणार नाही याची काळजी घेऊन बाजारपेठेत स्थिरता ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात केळीमालाची अनुपलब्धता व वाढती मागणी लक्षात घेऊन भाव वधारण्याची शक्यता जास्त आहे-सदानंद महाजन, शेतकरी, तांदलवाडी