शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:46 IST

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरात्रीतून कूपनलिका पडताय कोरड्या तयार माल कापणीकरीता विनवणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. दररोज एक ना एक चालू स्थितीत असलेली कूपनलिका बंद पडत आहे किंबहुना पाण्याचा दाब अचानक कमी होत आहे.गत तीन वर्षांपासून सतत कमी होत असलेला पावसाळा आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर येऊन ठेपला आहे. जसजसा उन्हाचा पारा चढत चालला आहे तसतसा शेतकरी संकटात सापडत चालला आहे. उन्हाच्या तप्त लाटा केळीला मारक ठरत आहेच. परंतु खोडांना कमी पाणी मिळत असल्याने कडक उन्हासमोर तग धरणे कठीण झाले आहे. घडांच्या वजनामुळे खोडं मध्यभागातून आडवे पडत आहेत. यामुळे होणारे नुकसान असह्य झाले आहे तर काही ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनदेखील पाण्याचा काहीही सहारा लागत नाही. यामुळे केळी सोडायची वेळ अली आहे. आतापर्यंत केळी जगविण्यासाठी झालेला खर्च व आता पाण्याकरिता होणारा पैसा निव्वळ वाया गेला असून, दुहेरी मार बसत आहे.पाणी पातळी खूप खोल गेली आहे. परिणामी कूपनलिकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीतून पाणी अर्धवटच निघण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत किती केळी वाचणार हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे.केळी कापणीसाठी शेतकरी रडकुंडीसभाव द्याल तो द्या, पण केळी कापा, असा निरुत्साही प्रश्न शेतकरी नाइलाजात्सव व्यक्त करत आहे. गेल्या वर्षी अ‍ॅडव्हान्स लागवड केलेल्या शेतकºयांच्या केळी बागेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. मात्र मागणी नसल्याचे कारण दाखवत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन माल खेरेदी करण्याचा फंडा सुरू असून, शेतकºयांना नागवले जात आहे. शेवटी बागेत माल खराब होऊन फेकण्यापेक्षा जो भाव मिळेल तो द्या पण माल कापा, असा टाहो फोडत आहे .पिलबाग तर नकोचनवती मालाला उचल जेमतेम असताना पिलबाग तर नकोच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उभे असलेले पिलबाग फेकून देण्यातच धन्यता मानली जाणार आहे. ६ जून २०१८ ला केºहाळेसह परिसरात संपूर्ण महसूल मंडळातील केळी बाग वादळामुळे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी पिलबाग ठेवण्यास पसंती दिली होती. जेणेकरून कमी खर्चात उत्पादन येईल. परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता झालेला खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी या पिलबागांचा फटका नवती केळीला बसत आहे .टरबूज ठरले केळीला अडसरकेळीला पर्याय म्हणून बºयाच शेतकºयांनी टरबूज लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली होती. ती आजही सुरू आहे. त्या मानाने उत्पादनसुद्धा खूप घेतल.े मात्र तेसुद्धा भावाअभावी गाफील ठरले आणि अति प्रमाणात उत्पादन आल्यामुळे केळीच्या मागणीला अडसर ठरले आहे.

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर