शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

बाबा राम रहीमच्या समर्थकांच्या आंदोलनाचा केळी निर्यातदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 5:46 PM

पंजाब-हरियाणातील हिंसाचारामुळे जळगावातून होणारी केळीची निर्यात थांबली. ब:हाणपूर येथील केळीभावात 500 रुपयांची घसरण.

ठळक मुद्देब:हाणपूरच्या केळी लिलावात दररोज 300 ट्रकची आवकआंदोलनामुळे केळी भावात 500 रुपयांची घसरणकेळी निर्यात मंदावल्याने मालाच्या उठावावर परिणाम

किरण चौधरी/ऑनलाईन लोकमत रावेर, दि.28 - डेरा सच्चा सौदा दरबारातील रामरहीम बाबा उर्फ गुरूमीतसिंगला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी पंजाबसह- हरियाणात हिंसाचार सुरु केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून या ठिकाणी होणारी केळीची निर्यात थांबली आहे. मागणी घटल्याने ब:हाणपूर च्या केळीभावात सुमारे 400 ते 500 रू प्रतिक्विंटल फटका बसला आहे.   हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या गुरूमीतसिंग उर्फ राम रहीम बाबाला  साध्वीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यानंतर कथित अनुयायांनी हिंसाराचा कहर केला आहे. त्यात निष्पाप व निरपराध 26 जणांचा बळी घेतला. या हिंसाचारामुळे पंजाब-हरियाणा राज्यात जमावबंदीची परिस्थिती असून रहदारी ठप्प आहे. हरियाणातील पंचकुला, सिरसा, मनसेर व रोहतकसह संपुर्ण पंजाबमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे केळी निर्यातीला ब्रेक बसला आहे. वाढती मागणी असतांनाही रोजची होणारी केळी निर्यात मंदावल्याने केळीमालाच्या उठावावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.    दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू - काश्मीरमधील निर्यातीत अनियमितता असते. त्यातच पंजाब व हरियाणात केळी निर्यात पुर्णपणे ठप्प झाल्याने केळीमालावर मंदीचे सावट आले आहे. सुमारे दीड हजार रुपये प्रतिक्विंटल वरून एक हजार रुपये प्रतिक्विंटलर्पयत केळीभाव आले आहेत. मध्यप्रदेशातील ब:हाणपूरच्या केळी लिलाव बाजारात दररोज 200 ते 300 ट्रक लागत असतानाही 1500रू प्रतिक्विंटल वरून 1000 रू प्रतिक्विंटल पयर्ंत 500 रू नी केळीभाव गडगडले आहे.  गुरूमीतसिंग उर्फ राम रहीम बाबा यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर  उफाळलेल्या हिंसाचारामुळे मोठा फटका बसला आहे. केळी उत्पादकांना त्याची किंमत चुकवावी लागत आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यास केळी निर्यात सुरळीत होवून भावातही सुधारणा होण्याची आशा आहे - रामदास पाटील, अध्यक्ष, रावेर केळी युनियन, रावेर.