शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:03 IST

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही.

मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यातच, आगामी पोटनिवडणुकीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण ते तात्पुरत्या निर्णयाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला आत मशाल घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तर, शिंदे गटालाही नवीन चिन्ह लवकरच मिळणार आहे. तर, उद्धव ठाकरेंनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं असून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निश्चित झालं आहे. त्यावरुन, माजी मंत्री सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच, बाळासाहेबांची शिवसेना ही संघाची असल्याचा योग जुळून येत असल्याचंही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं असून त्यांच्या शिवसेनेचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं राहणार आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांना अधिकृत चिन्ह मिळालेले नाही. मात्र, त्यांच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे राहणार आहे. एकंदरीतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण ढवळून निघाल आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 

संघाची स्थापना बाळासाहेबांनी केली

शिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना अस नाव मिळालं. दुसरीकडे संघाची स्थापना बाळासाहेब देवरस यांनी केली आहे. त्यामुळे, बाळासाहेब या नावाचा योगायोग या ठिकाणी जुळून आला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची सेना ही संघाची सेना असा अर्थ या ठिकाणी योगायोगाने निघतो, असे मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केले. धनुष्यबाण हे चिन्ह जनमानसात पूर्णपणे रुजल होतं, आता जे नवीन चिन्ह मिळाले आहे, ते रुजवण्यासाठी मोठे परिश्रम दोन्ही गटाला करावे लागतील. मात्र, दुसरीकडे संघटना ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे त्यांना प्रचाराला सोपं जाणार असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले .      पावसाच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळावी

परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं आहे. तर, कापूस पिकावर लाल्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, संकटात असलेल्या शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीतील अद्यापही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे म्हणत खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आता, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचेही लवकरात लवकर पंचनामे करावे, अधिकाधिक मदत शेतकऱ्याला मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडून व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेeknath khadseएकनाथ खडसेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ