शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
4
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
5
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
6
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
7
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
8
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
9
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
10
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
11
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
12
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
13
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
14
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
15
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
16
'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले
17
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
18
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
19
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
20
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

आईच्या कुशीतून लेकीला पळवलं; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:38 IST

आईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या अंधारात पसार झाला.

जळगाव : गेल्या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात किनगाव परिसरात बाळ ठार झाले असताना आता दोन वर्षाच्या बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बुधवारी रात्री घडली. 

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतशिवारात बुधवारी मध्यरात्री बिबट्याने रत्ना या दोन वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेले. ती आपली आई जिजाबाई रूपनर हिच्यासह झोपलेली होती. जिजाबाईला जाग येताच तिने आरडाओरडा केला; पण रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पसार झाला. थोड्या अंतरावर तिचा मृतदेहच आढळून आला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री एकच्या सुमारास वनअधिकारी विपुल पाटील, पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारीही रात्रीच येथे दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

बिबट्याला पाठवणार नागपूरलाघटनेनंतर घटनास्थळी चार पिंजरे लावण्यात आले. यापैकी डॉ. यश सागर व वनपाल गणेश गवळी यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात बसविण्यात आले. यानंतर रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास ज्या भागात चिमुरडीला ठार मारले होते, त्या परिसरात बिबट्या पोहचला. गवळी यांनी बिबट्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन शूट केले. नंतर तो काही मिनिटे तिथेच घुटमळला आणि बेशुद्ध झाला. यानंतर लागलीच बिबट्याला पिंजऱ्यात नेण्यात आले. या बिबट्याला शुक्रवारी नागपूर येथे पाठवण्यात येईल.

टॅग्स :Jalgaonजळगावleopardबिबट्या