अमळनेर- अहमदाबाद हावडा रेल्वेत शिंदखेड्याजवळ २५ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला. अमळनेरलारेल्वे थांबवून पुढील उपचारासाठी या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.आसाम राज्यातील दुमदुमा गावातील रहिवासी असलेला रितू अली हा सिल्वासा येथे एका कंपनीत कामाला आहे. त्याची पत्नी आरजू बेगम ही गर्भवती असल्याने तो तिला घेऊन सुरत येथून आसाम येथे जाण्यासाठी बसला. २२ रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान साधारणपणे शिंदखेड्याजवळ या महिलेला प्रसुतीपूर्व कळा सुरु झाल्या. यामुळे दोघे पती पत्नी गोंधळले. मात्र सहप्रवासी महिलानी एकत्र येत त्यांना शौचालयाकडे नेले.काही वेळेनंतर शौचालयातच महिलेची प्रसुती झाली. तिकीट तपासणीसाने अमळनेर येथे गाडी थांबवित शहरातील डॉ.किरण बडगुजर व डॉ.शरद बाविस्कर यांना बोलविले. त्यांनी महिलेची परिस्थिती पाहून तत्काळ रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी रक्तस्राव अधिक होऊ लागल्याने डॉ.संजय पाटील, ईश्वर बडगुजर यांनी पुढील उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बाळाची व महिलेची प्रकृती चांगली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:38 IST
अमळनेर- अहमदाबाद हावडा रेल्वेत शिंदखेड्याजवळ २५ वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला. अमळनेरला रेल्वे थांबवून पुढील उपचारासाठी या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.आसाम राज्यातील दुमदुमा गावातील रहिवासी असलेला रितू अली हा सिल्वासा येथे एका कंपनीत कामाला आहे. त्याची पत्नी आरजू बेगम ही गर्भवती असल्याने तो तिला घेऊन सुरत येथून आसाम ...
धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म
ठळक मुद्देअहमदाबाद-हावडा एक्सप्रेमध्ये झाली घटनागर्भवती महिला पतीसह जात होती आसाममधील आपल्या घरीसहप्रवासी महिलांनी शौचालयात नेत केली महिलेची प्रसुती