शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.बसची स्वच्छता करताना बांभोरीच्या चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:05 IST

एस.टी.बसची स्वच्छता करीत असताना अचानक छातीत कळा येऊन उलटी झाल्याने प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा.बांभोरी,ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धार शेरी (ता.धरणगाव) येथे घडली.

ठळक मुद्देधरणगाव तालुक्यातील धार शेरी येथील घटनागावात डॉक्टर उपलब्ध नसल्याने झाले नाही उपचारएस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात धाव

जळगाव : एस.टी.बसची स्वच्छता करीत असताना अचानक छातीत कळा येऊन उलटी झाल्याने प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा.बांभोरी,ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धार शेरी (ता.धरणगाव) येथे घडली. प्रेमराज सपकाळे हे जळगाव आगारात चालक म्हणून नोकरीला होते.रविवारी त्यांची धारशेरी मुक्कामी बसवर ड्युटी होती. सहकारी वाहक जाधव व सपकाळे दोघं जण बसमध्येच झोपले होते.सोमवारी सकाळी पाच वाजता ते उठून शौचास गेले. तेथून आल्यानंतर बसच्या काचा स्वच्छ करीत असताना अचानक त्रास होऊ लागला. काही क्षणातच त्यांना उलटी झाली. वाहक जाधव यांनी आरडाओरड करुन गावकºयांची मदत मागितली. गावात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने सपकाळे यांना तातडीने दुसºया वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.सपकाळे यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर एस.टी.महामंडळातील सहकाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सपकाळे यांच्या पश्चात पत्नी राणुबाई, मुलगी कल्याणी, पूजा व मुलगा शिवम असा परिवार आहे.शवविच्छेदन झाल्यानंतर सपकाळे यांचा मृतदेह बांभोरी येथे नेण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू