शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:10 IST

किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कुºहाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदा याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शनिवारी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल जखमीला औरंगाबादला हलविले

जळगाव : किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कु-हाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदा याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शनिवारी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गोविंदा गवळी हा तरुण कामावरुन घरी जात असताना मोहाडी गावात मराठी शाळेच्या समोर आतेभाऊ विजय गवळी याच्या किराणा दुकानावर गर्दी दिसली म्हणून तेथे गेला असता दुकानावर उधारीने किराणा साहित्य देण्याच्या कारणावरुन त्याच्याशी गावातील काही जण वाद घालत होते. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे व गोपाल तायडे यांनी गोविंदा यालाच घेरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली, त्याच वेळी शरद कोळी याने मागून येऊन गोविंदाच्या डोक्यात कुºहाडीने सपासप घाव घातले. यात गोविंदा याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊन बेशुध्द झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने शनिवारी त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.सर्व संशयित फरारया घटनेप्रकरणी गोविंदा गवळी याच्या जबाबावरुन संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे, गोपाल तायडे व शरद कोळी यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्याकडून हा तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाच अटक झालेली नाही, सर्व जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव