एमजी रोड गणेश मित्र मंडळ :
नेहरू चौकातील एमजी रोडवरील मित्रमंडळातर्फे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळातर्फे दरवर्षी विविध प्रकारची धार्मिक आरास सजविण्यात येत असते. मात्र, यंदा आरास न करता मंडळातर्फे गेल्या आठवड्यात चाळीसगाव येथील पूरग्रस्तांना धान्य व सांसारिक वस्तू वाटप करण्यात आल्या तसेच नागरिकांना मास्कचेही वाटप कररण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे १० वर्ष असून, अध्यक्ष म्हणून निखिल जोशी, उपाध्यक्ष मनोज चौधरी तर खजिनदार म्हणून दीपक जोशी काम पाहत आहेत.
तरुण कुढापा मित्र मंडळ :
तरुण कुढापा मित्रमंडळातर्फे यंदाही शासनाच्या सूचनेनुसार साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कुठलिही आरास न करता सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने, या लाटेपासून संरक्षणासाठी मंडळातर्फे नागरिकांनी लस घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मंडळाच्या परिसरात लसीकरणाचे महत्त्व, याविषयी जनजागृतीचे फलक लावण्यात आलेले आहेत. मंडळाचे यंदाचे ५८ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून पंकज महाजन तर उपाध्यक्ष म्हणून सुनील सपकाळे हे काम पाहत आहेत.
युवा दशरथ मित्र मंडळ :
युवा दशरथ मित्र मंडळाचे यंदाचे ११ वे वर्ष असून, मंडळाने यंदा शासनाच्या सूचनेनुसार कुठलीही आरास साकारलेली नाही. मात्र, गणेशोत्सवात कोरोनापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी आणि लसीकरणाबाबत जनजागृती केली आहे. मंडळात या जनजागृतीचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत तसेच मंडळातर्फे नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात येत असून, नागरिकांना मास्कही वाटप करण्यात येत आहे. आरतीच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांना उभे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून बबलू ठाकूर तर उपाध्यक्ष मनोज बारी काम पाहत आहेत.