तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:32 AM2017-09-23T00:32:50+5:302017-09-23T00:38:45+5:30

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हय़ात शेवटच्या दिवशी शेकडो अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Attendees' Attendance in Tehsil Offices | तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांची जत्रा

तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांची जत्रा

Next
ठळक मुद्देसरपंचपदासाठी 418, सदस्यपदासाठी 1301 उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन लोकमत जळगाव, दि. 22 : जिल्हय़ातील विविध ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी ( दि.22) शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 418 तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 1301 अर्ज दाखल करण्यात आले. पितृपक्षामुळे उमेदवारी दाखल करण्याचे टाळणा:या इच्छुकांनी आज समर्थकांसह सकाळपासूनच तहसील कार्यालय गाठल्याने तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. या निवडणुकीसाठी दाखल अर्जाची संख्या आजचे अर्ज धरून शेकडोंच्या घरात गेली आहे. दरम्यान, नगाव ता. अमळनेर येथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून इतरही काही ठिकाणच्या सरपंचपदासाठीही एकमेव अर्ज आल्याने तेथे सरपंच निवड बिनविरोध होणार आहे. रात्री उशीरार्पयत तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत आकडेमोड सुरू होती. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत 27 सप्टेंबर आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमळनेर : तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी 48 तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 212 अर्ज दाखल झाले. जामनेर : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी 218 अर्ज दाखल झाले. दरम्यान, चिलगांव व खादगांव येथे सरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला तर करमाड येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याचे सांगण्यात आले. सदस्यांसाठी 182 व सरपंचपदासाठी 36 अर्ज आले आहेत. चोपडा : तालुक्यात चार गावांमध्ये शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 12 अर्ज तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी 81 अर्ज दाखल झाले. पारोळा : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 36 तर सदस्य पदासाठी 122 अर्ज दाखल करण्यात आले. जळगाव : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवशी एकूण 197 अर्ज दाखल झाले. यामध्ये सदस्य पदासाठी 161 तर सरपंचपदासाठी 36 अर्ज दाखल झाले. धरणगाव : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवशी सरपंचाच्या 6 जागांसाठी एकूण 21 अर्ज प्राप्त झाले. तर या सहा ग्रामपंचायतीच्या 44 सदस्यांच्या जागेसाठी एकूण 75 अर्ज दाखल झाले आहेत. एरंडोल : तालुक्यातील जवखेडेसीम, रवंजे बु।।, पिंपळकोठा प्र.चां. या ग्रा.पं. मध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 17 अर्ज तर सदस्यपदासाठी 84 अर्ज दाखल झाले आहेत. भडगाव : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरीता 17 तर सदस्य पदासाठी 131 अर्ज दाखल झाले आहेत. चाळीसगाव : तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी होणा:या निवडणुकीत शेवटच्या दिवशी अनुक्रमे 70 आणि 342 अर्ज दाखल करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 32 तर सदस्यपदासाठी 130 अर्ज दाखल झाले आहेत. यावल तालुक्यातील 8 आठ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 38 तर सदस्यपदासाठी 214 अर्ज प्राप्त झाले आहेत. रावेर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 76 तर सदस्यपदासाठी 409 अर्ज दाखल झाले आहेत. बोदवड तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 17 तर सदस्यपदासाठी 71 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Attendees' Attendance in Tehsil Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.