अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:37 PM2020-09-11T14:37:16+5:302020-09-11T14:37:35+5:30

कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Attempts to prune and destroy live neem trees in Anturli Shivara | अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न

अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न

googlenewsNext

मुनाफ शेख
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : शेती शिवारातील कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागाने अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मांगणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वायली रस्त्यावरील रीतेश पाटील व प्रकाश खोजे यांच्या शेताच्या बांधावरील कडूनिंबाची सुमारे १५ जिवंत झाडे तोडून नेण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने झाडाला खोडाजवळ कुºहाडीने छाटले आहे. झाडाला जखमी केल्याने ते वाळल्यावर ते घेऊन जाण्याच्या उद्देशाने त्यांंनी असे केले असावे. पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी शेतकरी शेताच्या बांधावर कडूनिंबाची झाडे लावतात. परंतु काही विध्नसंतोषी लोक जिवंत झाडांची कत्तल करून घेऊन जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Attempts to prune and destroy live neem trees in Anturli Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.