शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

चोपड्यात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 23:14 IST

तापी सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसला. पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांनी चोपडा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसूतगिरणीच्या आवारातील घटना पोलिसात तक्रार दिल्याने उघडकीस आला प्रकार

चोपडा, जि.जळगाव : तापी सूतगिरणी आवारात घटस्थापनेच्या मध्यरात्री गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न प्रसंगावधानामुळे फसला. पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांनी चोपडा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.सूत्रांनुसार, वडगावसीम, ता.चोपडा येथील रहिवासी व पंचायत समिती सदस्य तथा भरत विठ्ठल बाविस्कर व चौगाव येथील सुकालाल कोळी हे दोघे जण कामानिमित्ताने १७ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे गेले होते. काम आटोपून रात्री उशिरा चोपडा येत असताना सूतगिरणीच्या मुख्य गेटजवळून जात असताना मला वाचवा, मला वाचवा असा मोठा आवाज देत एक व्यक्ती पळताना व त्याच्या मागे ५ ते ६ जण त्याला पकडण्यासाठी धावताना दिसले.याबाबत पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मध्य रात्री प्रथमदर्शनी चोरीचा प्रकार असावा म्हणून ती चार पाच व्यक्ती त्या चोराला पकडण्यासाठी पळत असावी, असे बाविस्कर व कोळी यांना वाटले. म्हणून खरी हकीकत जाणून घेण्यासाठी दोघेही गेटजवळ गेले. तेवढ्यात तो पळणारा अनोळखी व्यक्ती कंपाऊंडवरून उडी घेऊन बाहेर पडला. त्याला पकडण्यासाठी धावणाऱ्या त्या ५ ते ६ जणांनी गेट उघडून त्याच्या मागे धाव घेतली. हा प्रकार नेमका काय आहे. म्हणून जाणून घेण्यासाठी बाविस्कर व कोळी यांनी गेटवर जमलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले असता नरबळी देण्याचा भयानक प्रकार ऐकण्यास मिळाला.बाहेरील तालुक्यातील एका आदिवासी व्यक्तीचा गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा घाट सूतगिरणीचे कर्मचारी प्रफुल पवार, गोरगावले येथील मनोहर पाटील, घुमावल येथील दीपक पाटील व त्यांचे सहकारी यांचा होता. पूजा व साहित्याची मांडणी करून तापीच्या पाण्याने त्याची आंघोळ करून सूतगिरणीच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरू असलेल्या बांधकामाकडे घेऊन गेले. त्या ठिकाणीं निंबू, अंडी, अगरबत्ती, मिरची, गुलाल, भिलावे, नवी चादर, सुई असे साहित्य पाहिल्यावर सदर व्यक्तीच्या लक्षात आले की ठिकाणीं आपला बळी देवून धन काढण्याचा ह्या लोकांचा प्रयत्न दिसतो म्हणून त्याने प्रसंगावधान राखून प्रफुल्ल पवार नामक व्यक्तीच्या हाताला चावा घेऊन धूम ठोकली. त्याच्या सतर्क राहण्याने पुढील अनर्थ टळला, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी भित-भित दिली. त्यामुळे बळी गेला नाही किंवा गुप्तधन निघाले नाही. परंतु गुप्तधन काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळ सूतगिरणी असल्यामुळे यात शासनाचीही फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांचीही भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे.चौकशी सुरू आहे- पोलीस निरीक्षक संजय ठेंगेया प्रकाराबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर व सुकलाल कोळी यांनी तक्रार अर्ज दिला आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, २८ रोजी तक्रार अर्ज आलेला आहे. त्यास अनुसरून खरोखर असा प्रकार घडलेला आहे किंवा नाही याबाबत चौकशी सुरू असल्याचे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.

असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही- चेअरमन कैलास पाटीलया घटनेबाबत संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार सूतगिरणीच्या परिसरात खपवून घेतला जाणार नाही. मलाच असा प्रकार अजिबात सहन होत नाही. केवळ बदनामीसाठी आणि अवैध मार्गाने वाळू वाहतूक केल्याप्रकरणी तक्रार केल्यामुळेच हे प्रकार होत असल्याचे तापी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChopdaचोपडा