शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चेहऱ्यावर स्प्रे मारून पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:21 IST

गणेश कॉलनी परिसरातील घटना

ठळक मुद्दे व्यापा-याने आरडा-ओरड केल्यानंतर चोरट्यांनी काढला पळस्प्रे मारल्याने चेहरा सुजला

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरात असलेल्या शुभकामना संकुलाजवळील रस्त्यावर गोविंद राठी (वय-४५, रा़ गणेश कॉलनी) या व्यापाºयाच्या चेहºयावर केमिकलचा स्प्रे मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे़ दरम्यान, राठी यांनी आरडाओरड केल्याने मोटारसायकलवर आलेले चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. ही घटना १६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.या घटेबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश कॉलनी परिसरातील शुभकामना संकुलाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेले व्यापारी गोविंद राठी यांचे दाणाबाजारात दुकान आहे़ १६ आॅगस्ट रोजी नेहमी प्रमाणे राठी यांनी दाणा बाजारातील दुकान बंद करून त्यांच्या मोटारसायकलीने घरी येण्यासाठी निघाले. घरापासून काही अंतरावर मागून मोटारसायकलवर दोन तरूण त्यांचा पाठलाग करीत होते़ रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ते शुभकामना संकुलाजवळून जात असताना दोघा तरुणांनी त्यांच्या तोंडावर केमिकलचा स्प्रे मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. राठी यांनी चोरट्यांचा जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केली व घराच्या प्रवेशद्वारात धाव घेतली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला़बॅगेत हजारोंची रोकडराठी यांच्या बॅगेत दुकानाची रोकड असल्याने मोटारसायकलवर आलेले चोरटे दाणाबाजारापासून त्यांच्या मागावर असल्याचे राठी यांनी जिल्हापेठ पोलिसांना सांगितले. राठी यांचा पाठलाग करून त्यांच्या घराजवळील शांततेच्या ठिकाणी त्याच्या चेहºयावर स्प्रे मारून लुटण्याचा प्रयत्न केला़दरम्यान, चोरट्यांनी राठी यांच्या तोंडावर मारलेला स्प्रे हा शेतामध्ये औषध वापरल्या जाणाºया उग्र वास येणाºया स्प्रे असल्याचे राठी यांनी सांगितले़ स्प्रे मारल्याने राठी यांच्या चेहरा व डोळ्यात जळजळ झाली. तसेच राठी यांना लेगच गुंगी येत असल्याने राठी यांनी आरडाओरड करून जवळच असलेल्या त्यांच्या घरात धाव घेतल्यामुळे बॅग चोरी होण्यापासून वाचल्याचे पोलिसांना सांगितले़स्प्रे मारल्याने चेहरा सुजलास्प्रे मारल्याने राठी यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. यापूर्वी लुटण्यासाठी मिचीर्पूड, गुंगीचे औषध टाकून लुटण्याच्या घटना समोर आल्या होत्या. उग्र वासाचा स्प्रे चेहºयावर मारून लुटण्याचा प्रयत्न आता केला. या घटनेमुळे स्प्रे मारून लुटण्याची पहिलीच घटना असल्याचे पोलिसांकडून समजते. याबाबत पोलिसांकडून घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे़ दरम्यान, याबाबत उशीरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नाही़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव