शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:32 IST

निमखेडी येथून दुचाकीने शहरात येत असलेल्या अनिल एकनाथ नन्नवरे (२३, रा. निमखेडी, जळगाव) या तरुणावर रस्त्यात दुचाकी आडवी लावून दोघांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता दादावाडी परिसरात घडली. विशाल अनिल पाटील (रा.साईनगर, जळगाव) व महेश उर्फ डोम्या वासुदेव पाटील (रा.हिराशिवा कॉलनी, जळगाव) या दोघांनी हा हल्ला केल्याचे जखमी अनिल याने पोलिसांना सांगितले.

ठळक मुद्दे पूर्ववैमनस्यातून घडली घटना दुचाकी आडवी लावून केले सपासप वार हल्लेखोर पसार
जळगाव : निमखेडी येथून दुचाकीने शहरात येत असलेल्या अनिल एकनाथ नन्नवरे (२३, रा. निमखेडी, जळगाव) या तरुणावर रस्त्यात दुचाकी आडवी लावून दोघांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता दादावाडी परिसरात घडली. विशाल अनिल पाटील (रा.साईनगर, जळगाव) व महेश उर्फ डोम्या वासुदेव पाटील (रा.हिराशिवा कॉलनी, जळगाव) या दोघांनी हा हल्ला केल्याचे जखमी अनिल याने पोलिसांना सांगितले. अनिल हा मंगळवारी न्यायालयाकडे येत असताना या दोघांनी एकमेकाकडे पाहिले होते. खुन्नस ने का पाहतो? या कारणावरुन तिघांमध्ये वाद झाला होता. बुधवारी तो शहरात येत असताना विशाल व महेश या दोघांनी दादावाडी परिसरात त्याच्या दुचाकीच्या समोर दुचाकी आडवी लावून त्याला अडविले व काही कळण्याच्या आतच अनिलवर चॉपरने सपासप वार केले. यात छातीत, पोटात, मांडीवर व हातावर खोलवर गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला ओळखीच्या लोकांनी खासगी दवाखान्यात हलविले. अनिल याची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, जितेंद्र पाटील व सतीश हळणोर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस करुन जबाब नोंदविला.हल्लेखोरांच्या शोधार्थ पथक रवानापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लयानंतर हल्लेखोर लगेच पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहे. गेल्या महिन्यात देखील अनिलशी या दोघांचा वाद होता. अनिलचा भाऊ सुनील वाळूचा व्यवसाय करतो. जखमी अनिलवर आर्म अ‍ॅक्ट व हाणामारीचा गुन्हा दाखल आहे तर आरोपी महेशविरुध्दही मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे. जखमीचा भाऊ देखील पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाला असला तरी पाळत ठेवूनच अनिलवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव