शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कैद्यांच्या भांडणात तुरुंगाधिकाऱ्यावरच झाला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:14 IST

कारागृहातील प्रकार

जळगाव : प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंग अधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर सचिन दशरथ सैंदाणे (३०) या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हा कारागृहात घडली.दरम्यान, या घटनेत पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कैदी सचिन सैंदाणे याने स्वत:चे डोके फोडून घेतले. सचिनने स्वत: डोके फोडले नसून अधिकाऱ्यांनी त्यालाच मारहाण केली व रुग्णालयातही नेले नाही, अशीही चर्चा होती. त्याचा अधीक्षकांनी इन्कार केला आहे.रक्षकाचा झटापटीत पाय मुरगळलाबॅरेकमध्ये आरडाओरड होत असल्याचे पाहून तुरुंगाधिकारी पवार यांनी बॅरेककडे धाव घेत सचिन व महेशचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सचिनने पवार यांच्यावर लोखंडी पट्टीने वार केले. यात पवार याच्या उजव्या हाताला मनगटाजवळ दुखापत झाली आहे. या झटापटीत कर्मचारी हिवरकर यांना दुखापत झाली. सैंदाणे याची यापूर्वीही वादाबाबत न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे.पैशांच्या मागणीवरुन कैद्यांमध्ये भांडणशनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक तसेच आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात सचिन दशरथ सैंदाणे हा न्यायालयीन कोठडीत असून ३ आॅक्टोंबर २०१६ पासून कारागृहात आहे. तर महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (२०) हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. सचिन याने सोमवारी सायंकाळी महेशकडे ५ हजार रुपयांची मागणी केली, मात्र त्याने त्याला नकार दिला.याच कारणावरुन मंगळवारी दोघांमध्ये वाद झाला व नंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी महेशचे तोंड दाबून धरल्याचे समजते.पाच हजार रुपये मागण्याच्या कारणावरुन दोन कैद्यांमध्ये वाद झाला. भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंगाधिकारी यांनाही कैद्याकडून झटापटी झाली व त्यात ते जखमी झाले. कैद्याला अधिकाºयांनी मारहाण केलेली नाही. वरिष्ठांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.-अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव