शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बाबा साईराम, आयो लाल.. झुलेलाल! डॉ. विजय दर्डा यांनी केला सिंधी समाजाच्या सेवाकार्याचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:11 IST

१७५ वर्षांची परंपरा असलेल्या  उत्सवासाठी ३६ देशांतून भाविक आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : येथील अमर शहीद संत कंवरराम, संत बाबा हरदासराम, गोदडीवाला व बाबा गेलाराम यांच्या वर्सी महोत्सवात लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह भेट घेत संतांसोबत संवाद साधला. सिंधी समाजबांधवांकडून चालविल्या जाणाऱ्या सेवा व धार्मिक कार्याचा त्यांनी यावेळी बोलताना गाैरव केला. या वर्सी महोत्सवात सोमवारी सत्संग, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी महोत्सवाचा समारोप झाला. 

संत कंवरराम नगर पूज्य सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वर्सी महोत्सवात डॉ. विजय दर्डा, सुरेशदादा जैन यांनी सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ येथे भेट देऊन संत हरदासराम, संत गेलाराम बाबा यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच संत फकीर साई लखनौ यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजू आडवाणी, भगत बालाणी, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसराणी,  अशोक मंधान, रमेश मताणी, ओमप्रकाश कौराणी, माजी नगरसेवक मनोज अहुजा, जितेंद्र मुदंडा,  आयुष मणियार आदींनी डाॅ. विजय दर्डा यांचे स्वागत केले.

३६ देशांतून भाविक

१७५ वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवासाठी ३६ देशांतून भाविक आले होते. तीन दिवस अखंड पाठसाहेब व भजन-सत्संग झाला. ‘दिना बंधू दिनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ’, ‘बाबा..साईराम’, ‘आयो लाल...झुलेलाल, अमरलाल.. कंवरलाल’ या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा