चाळीसगाव : माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रभाकर चौधरी हे मागील गुन्ह्यासंदर्भात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सह्या करून पोलीस स्टेशनबाहेर निघत होते. तेव्हा त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मागील वैमनस्यतून घडली आहे. जगदीश महाजन, दादू जगदीश महाजन, संजय घटी, सौरभ संजय घटी यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे समजते. या हल्ल्यानंतर प्रभाकर चौधरी यांना तातडीने चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 15:14 IST