शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

असोद्यात पतीने पत्नीला जीवंत पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:02 IST

अंगावर ओतले आॅईल : पती फरार,दोन नंदांना अटक

जळगाव : कौटुंबिक व आर्थिक कारणातून पतीने पत्नीच्या अंगावर आईल ओतून पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजता असोदा, ता.जळगाव येथे घडली. या घटनेत कांचन संतोष नन्नवरे (३०) ही विवाहिता गंभीर जखमी झाली असून पती संतोष प्रकाश नन्नवरे, नणंद आशा शांताराम साळुंखे (रा.शिव कॉलनी) व सपना अमृत सोनवणे (रा.घार्डी, ता.जळगाव) या तिघांविरुध्द गुरुवारी तालुका पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोनही नंदांना पोलिसांनी अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील असोदा येथे जखमी कांचन ही पती संतोष प्रकाश नन्नवरे, सासरे प्रकाश रामादास नन्नवरे, मुले सारंग, संग्राम व मुलगी विशाखा यांच्यासह वास्तव्याला आहे. गेल्या आठ दिवसांपासून नणंद आशा शांताराम साळुंखे व सपना अमृत सोनवणे या असोदा येथे आलेल्या आहेत. तेव्हापासून दोनही जण किरकोळ कारणांवरुन कांचन यांच्याशी भांडण करीत आहेत. त्यात सासरे प्रकाश नन्नवरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पती संतोष याने भाऊ दिनेश व त्याची पत्नी माधुरी यांनाही बुधवारी असोदा येथे बोलावून घेतले आहे. सासऱ्यांच्या बॅँक खात्यात मोठी रक्कम असल्याने या कारणावरुन देखील नणंद कांचनशी वाद घालत होत्या. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पती व दोनही नंदा यांनी कांचनसोबत भांडण केले. ‘तु माहेरी निघुन जा, वडीलांचे निधन झाल्यानंतर आम्ही त्यांचे सर्व काही करुन घेऊ’ असे सांगून भांडण केले तर ाती संतोष याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्री १० वाजता कांचन घराच्या मागच्या बाजुस लघुशंकेसाठी गेल्या असता पती संतोष याने मागुन येऊन अंगावर आॅईल फेकले व नंतर आगकाडीने पेटविले. या प्रकारामुळे कांचन यांनी आरडाओरड व किंचाळ्या मारल्याने आवाज ऐकून दीर दिनेश व दिराणी माधुरी यांनी घराबाहेर धाव घेतली. दोघांनी कांचनच्या अंगावर चादरी टाकुन त्यांना विझवले व तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कांचन ५० टक्के भाजल्या गेल्या आहेत. कांचन यांनी गुरुवारी फिर्याद दिली. त्यानुसार पती संतोष, नंदा आशा व सपना या तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव