चाळीसगाव, जि.जळगाव : महावीर विकलांग सेवा समिती जयपूर, डॉ.महेश पाटील यांचे मातोश्री हॉस्पीटल आयोजित कृत्रिम अवयव रोपण शिबिरात २५५ दिव्यांगांना लाभ झाला. त्यांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. शिबिर दोन दिवस चालले. यावेळी मीनाक्षी निकम उपस्थित होत्या.प्रास्ताविकात डॉ.महेश पाटील यांनी मोफत शिबिर घेण्याची भूमिका विशद केली. शिबिरामुळे गरजू दिव्यांग बांधवांना लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.शिबिरात संपूर्ण जिल्यातून दिव्यांग बंधू भगिनी आले होते. यात ज्यांचे गुडघ्याच्या वरती पाय कट झालेल्या २५, गुडग्याच्या खाली पाय कट झालेले ३३, पोलिओ यांना कॅलिप्सर १३१, काठ्या-कुबड्या ४५, श्रवण यंत्रे पाच, व्हीलचेअर पाच, सिंगल कॅलिपर्स अकरा अशा एकूण २५५ दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. गरजू दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविल्यात आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. यात वृद्ध दिव्यांगांचाही समावेश होता.
चाळीसगावला २५५ दिव्यांगांंना कृत्रिम अवयव रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:32 IST
महावीर विकलांग सेवा समिती जयपूर, डॉ.महेश पाटील यांचे मातोश्री हॉस्पीटल आयोजित कृत्रिम अवयव रोपण शिबिरात २५५ दिव्यांगांना लाभ झाला. त्यांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.
चाळीसगावला २५५ दिव्यांगांंना कृत्रिम अवयव रोपण
ठळक मुद्देशिबिराचे आयोजन मातोश्री हॉस्पीटल व अपंग संस्थेचा सहभाग