शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दर्ग्यातील दानपेटी चोरणाऱ्यास पिंप्राळ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:41 IST

जळगाव : चार दिवसांपूर्वी खाँजामिय्या दर्ग्यामधील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दिनेश ताराचंद चव्हाण (रा़ ...

जळगाव : चार दिवसांपूर्वी खाँजामिय्या दर्ग्यामधील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दिनेश ताराचंद चव्हाण (रा़ मढी चौक, पिंप्राळा) यास पिंप्राळ्यातून अटक केली असून त्याच्याजवळून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़शहरातील गणेश कॉलनी परिसरातील खाँजामिय्या दर्ग्यातून अज्ञात चोरट्याने चार दिवसांपूर्वी दानपेटी चोरून नेली होती़सकाळी स्वच्छता करण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरीचा प्रकार कळताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती़ त्याचबरोबर दर्गा पसिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटा दिसून आला होता़ ते फुटेज पोलिसांना देण्यात आले होते़जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील डिबी कर्मचारी नाना तायडे यांनी तपास करीत दिनेश चव्हाण नामक तरुणाने चोरी केल्याची माहिती समोर आली़कोळश्याच्या पोत्यात लपविली दानपेटीजिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नाना तायडे, प्रशांत जाधव, हेमंत तायडे, अविनाश देवरे, शिवाजी धुमाळ, उमेश पाटील यांनी संशयिताच शोध घेण्यास सुरुवात केली़ अखेर पिंप्राळ्यातील मढी चौकात संशयित चोरटा दिनेश हा राहत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नाना तायडे यांना मिळाली़ त्यानुसार लागलीच शुक्रवारी त्यास राहत्या घरून अटक करण्यात आली़ त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे़ तर चोरी केलेली दानपेटी ही कोळश्याच्या पोत्यात लपवून ठेवलेली असल्याने ती पोलिसांना काढून दिली़ सुमारे १४ हजार रुपयांचा रोकड त्या असल्याची समोर आले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव