शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटवर आॅनलाईन सट्टा घेणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:05 IST

 मोबाईल दुकानात पकडले

ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

जळगाव : क्रिकेटवर बेटींग आॅनलाईन सट्टा घेणाºया भावेश पंजुमल मंधान (वय ३०, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) याला अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गोलाणी मार्केटमध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला मुंबई जुगार अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोलाणी मार्केटमध्ये सोना मोबाईल शॉपी या दुकानात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट व अन्य खेळांवर आॅनलाईन बेंटींग केली जात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सुनील दामोदरे, विजय सोनवणे, अजय पाटील व रफिक शेख यांच्या पथकाला खात्री करण्यासाठी पाठविले होते. त्यानुसार या पथकाने डी विंग मधील सोना मोबाईलवर धाड टाकली असता भावेश हा आॅनलाईन सट्टा घेत होता. राजेशभाई व जितू भाई या दोन जणांकडून तो सट्टा घेत असल्याचे निष्पन्न झाले. मतानी यांनी सायंकाळी स्वत: येवून चौकशी केली.दोन दिवस पाळत ठेवून पथकाची कारवाईपथकाने दोन दिवस संबंधित प्रकाराबाबत खात्री करण्यासाठी पाळत ठेवली. क्रिकेट बेटींग होत असल्याची खात्री झाल्यावर पथकाने भावेश याला ताब्यात घेतले. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात आणत असताना संशयितान्गोंधळ घातला व बेटींग करत असलेले मोबाईल पोलिसाकडून लपविण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडील दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी