शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईलने मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:53 IST

जळगाव - कार्यालयीन कामकाज संपवून शिवतीर्थ मैदानाजवळून पायी जात असलेल्या लोकेश वना गगणे (रा़ महाबळ परिसर) या तरूणाच्या हातातून ...

जळगाव- कार्यालयीन कामकाज संपवून शिवतीर्थ मैदानाजवळून पायी जात असलेल्या लोकेश वना गगणे (रा़ महाबळ परिसर) या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धूम स्टाईलने महागडा मोबाईल चोरून नेला होता़ याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला संशयितांना पकडण्यात यश आले असून भूषण विजय माळी (१९) व आकाश सुकलाल ठाकूर (१९, दोन्ही रा़ तुकारामवाडी) असे संशयितांची नावे आहेत़ एक संशयित मात्र फरार आहे़महाबळ कॉलनी परिसरातील रहिवासी लोकेश गगणे हा २७ आॅगस्ट रोजी चाळीसगाव येथे गेला होता़ रात्री कार्यालयीन कामकाज आटोपून जळगावात परतल्यानंतर शिवतीर्थ मैदानाजवळून घरी पायी जात असताना रात्री १०़३० वाजेच्या सुमास मागून दुचाकीवरून ट्रीपल सीट आलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्याने लोकेश याच्या हातातून मोबाईल हिसकावला व तिघांनी तेथून धूम ठोकली़ त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मोबाईल चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़दोघांना केली अटकगुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाडून चोरट्यांचा शोध सुरू होता़ अखेर स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाला मोबाईल चोरटे हे तुकारामवाडी येथील असल्याची माहिती मिळाली़ तर भूषण माळी, आकाश ठाकूर व विशाल कोळी या तिघांनी ही चोरी केल्याचेही निष्पन्न झाले़ अखेर स्थानिक गुन्हे पथकाने शनिवारी भूषण कोळी व आकाश ठाकूर या दोघांना तुकारामवाडी येथून अटक केली़ तिसरा साथीदार पसार आहे़यांनी केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखा पथकातील रवींद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, सुधाकर अंभोंरे, अनिल जाधव, अश्रफ शेख, दादा पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारूळे यांनी चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई केली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव