शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कपाशीसह ट्रक लांबवणाऱ्यास अटक : धरणगाव पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:28 IST

एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक केली.

ठळक मुद्देसाडेसात लाखांची होती कपाशीट्रक लांबविणारा गुजरातमध्ये जेरबंद

धरणगाव : येथील एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक केली. ऐनदिवाळीच्या वेळी मोठे नुकसान टळल्यामुळे व्यापाऱ्याने धरणगाव पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, भरतभाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा.न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.येथील कापूस व्यापारी सुनील विठ्ठल वाणी (रा. दत्त दुर्गानगर) यांनी निमखेडा, ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्याकडून साडेसात लाखांचा १४१ क्विंटल कापूस खरेदी केला होता. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी हा कापूस त्यांनी आदर्श ट्रान्सपोर्टचे मालक हसीन रशीदखान बेळगाववाला यांच्यामार्फत ट्रक (क्रमांक जीजे-११-व्हीव्ही-८८०५) यात भरून गुजरात राज्यातील अमेरीली जिल्ह्यात विक्रीसाठी महावीर कोटींचे मालक व तेथील व्यापारी योगेशभाई यांच्याकडे पोहोचविण्यास सांगितले होते. दि.९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुनील वाणी यांच्या लक्षात आले की, ट्रकचालक व मालकाशी संपर्क होत नाही. त्यांनी याबाबत ट्रान्सपोर्टचे मालक हसीन बेळगाववाला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ट्रान्सपोर्टमालकांनी सांगितले की, त्यांचादेखील ड्रायव्हर व गाडीमालक यांच्याशी होत संपर्क नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत सुनील वाणी यांची खात्री झाली की, त्यांचा कापूस चोरीला गेला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जे.एम.हिरे यांची भेट घेत, हकीगत सांगितली. हिरे यांनी तत्काळ फिर्याद नोंदवून घेत रात्रीच तपास पथकाला गुजरातकडे रवाना केले. या पथकात पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेकॉ खुशाल पाटील, उमेश पाटील यांचा समावेश होता.दि.१० नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील बेडवान शिवार, ता.डेडीयापाडा भागात आरोपीचा शोध घेऊन एकाला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण १४१ क्विंटल कापूस काढून दिला. याप्रकरणी भरतभाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा.न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत) याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी त्यांचा माल तर राज्यात विक्रीसाठी पाठविताना ट्रकचालक-मालक कागदपत्रे इत्यादींची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDharangaonधरणगाव