यंदा विसर्जनाच्या दिवशी मेहरूण तलावावर गर्दी होऊ नये, प्रशासनातर्फे घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या नागरिकांनी मनपातर्फे शहरात १२ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी घरगुती मूर्ती द्यायची आहे, तसेच त्या ठिकाणी निर्माल्य जमा करण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून, त्या ठिकाणीच ते निर्माल्य टाकायचे आहे. इतरत्र टाकू नये, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणीही नागरिकांना घरगुती मूर्ती देता येणार असून, या ठिकाणीही निर्माल्य संकलन करता येणार असल्याचे सचिन नारळे यांनी सांगितले.
इन्फो :
मनपातर्फे मेहरूण तलावावर विसर्जनाची तयारी पूर्ण :
मनपातर्फे मेहरूण तलावावर श्री गणरायाच्या विसर्जनासाठी तराफे तयार करण्यात आले असून, रात्रीच्या वेळेसाठी पथदिव्यांची व्यवस्थाही तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाचे कर्मचारी व जिल्हा आपत्ती विभागाचे कर्मचारी गणपतीचे विसर्जन करणार असून, त्यांच्या मदतीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्षक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचे पदाधिकारी मदतीला राहणार आहेत.