शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांचा सुगंध दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:42 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, आत्मा, कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजन

जळगाव : पावसाळा आठवलं की, तोेंडाला पाणी आणणाऱ्या रानभाज्यांचा घमघमाट जाणवू लागतो. बाजारपेठेत अभावानेच दिसणाºया या रानभाज्यांची चव मात्र अनेकांच्या जीभेवर रेंगाळत राहते. पण याच रानभाज्यांचा सुगंध रविवारी जळगावात दरवळला. अनेक रानभाज्या एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही नागरिकांना मिळाली.निमित्त होते, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र जळगाव व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवचे! या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रोटरी क्लब जळगाव वेस्टचे प्रेसिडेंट तुषार चित्ते, सचिव प्रविण जाधव, रमण जाजू, डॉ. राजेश पाटील, किरण राणे, सुनिल अग्रवाल, डॉ. सुशिलकुमार राणे, प्रकल्प अध्यक्ष योगेश भोळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की,रानभाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पाहता त्याचा आहारात वापर वाढला पाहिजे.रानभाज्या, त्यांची माहिती व त्यांचे आहारातील महत्व याविषयावर आहारतज्ज्ञ डॉ. अनंत पाटील तसेच मु. जे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे मनोजकुमार चोपडा यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी केले.उमेश पाटील व सहकाऱ्यांनी लिहीलेल्या रानभाज्या या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवा१ आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस तरी रानभाज्यांचा बाजार भरवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.२ कोरोनाच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे. रानभाज्यांचाही प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये मोठा वाटा असल्याचे पालकमंत्री म्हणाले.चांगला प्रतिसादया रानभाजी महोत्सवाला शेतकरी अन् ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ५०हून अधिक शेतकºयांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल यावेळी लावले होते. ग्राहकांनीही या रानभाज्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतर पाळून ग्राहकांनी खरेदी केली. अनेक रानभाज्या बाजारपेठेतही उपलब्ध होत नाही, त्या एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांनीही खरेदीचा आनंद लुटला.रानभाज्या हातोहात संपल्यारविवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत रानभाज्यांचा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील सर्व रानभाज्या दुपारी १ वाजताच संपून गेल्या.विशेष म्हणजे या रानभाज्या कशा बनवायच्या याची कृतीही काही शेतकºयांनी स्टॉलवर लावली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव