शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

जळगावात आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कारांचे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांच्या उपस्थितीत अविनाश पाटोळे यांना पुरस्कार वितरण

ठळक मुद्देयंदाच्या पुरस्काराचे मानकरी अविनाश पाटोळेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थितीजैन हिल्स येथील आकाश मैदानावर होणार पुरस्कार वितरण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२९ - जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभ जैन हिल्स येथे आकाश मैदानात शुक्रवार ३० मार्च रोजी सकाळी ११.४५ वाजता होत आहे. पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार असतील.विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कृषी, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री, आमदार एकनाथराव खडसे उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व संचालक मंडळ तसेच भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे ना.धों. महानोर, दलीचंद जैन व विश्वस्त मंडळाने केले आहे.ठिबक सिंचनासह आधुनिक कृषी उच्च-तंत्राचा वापर करून अनेकविध कृषी प्रयोगपद्धतीद्वारे बहुमोल योगदान व लक्षणीय उत्पादनार्थ ‘पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो. वर्ष २०१६ च्या पुरस्काराचे वितरण या समारंभात होणार असून या पुरस्काराचे मानकरी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अविनाश मनोहर पाटोळे हे ठरले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव