शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक समाजात पोट जातींमध्ये रोटी-बेटी व्यववहारास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 18:43 IST

साखरपुडा रद्द: प्रबोधन मेळाव्यात विविध क्रांतीकारी ठराव

भडगाव : नाभिक समाजातील जुन्या अहीतकारी रुढींना फाटा देत पोट जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार करणे व साखरपुडा पद्धत बंद करणे आदी विविध क्रांतीकारी ठराव येथे झालेल्या नाभिक समाजाच्या राज्यस्तरीय प्रबोधन मेळाव्यात करण्यात आले.नाभिक समाज मंडळाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र स्तरीय प्रबोधन मेळाव्याचे आयोजन मंगळवारी येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. मेळाव्यास जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांसह गुजराथ मधील बडोदा, सुरत, नवसारी व मध्यप्रदेशातील भोपाल, इंदोर, सेधवा, खेतीया येथील नाभिक समाजातील सर्व पोट जातींचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हरचंद सोनवणे नंदुरबार, रामभाऊ शिरसाठ खेतिया, आर. डी. महाले धुळे, वामनराव सुर्वे धुळे, पुरुषोत्तम निकम सुरत, दामोदर बिडवे बुलढाणा, शंकरराव वाघ निफाड, किशोर सुर्यवंशी जळगाव, कथ्थु संैदाणे नदुरबार, संतोष खोंडे, मुकुंद धजेकर, राजकुमार गवळी, सुधाकर सनांसे भुसावळ, सुनिल बोरसे चाळीसगाव, चुडामण बोरसे, बाजीराव सोनवणे, अनिल सोनवणे, दिपक महाले, सचिन निंबाळकर, सुंनदा सुर्वे, भारती सोनवणे जळगाव, प्रा. अ‍ॅड. विद्या बोरनारे तसेच मिनाक्षी भदाणे नंदुरबार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ शिरसाठ यांनी सामाजिक रूढी परंपरा या कालानुरूप बदल करणे आवश्यजक असल्याचे सांगितले.हे ठराव झाले मंजूरनाभिक समाजातील आहेर, मराठा, तायडे, दखनी, मारवाडी, गुजराथी, गुजर या पोटजातीत रोटी-बेटी व्यवहार सुरु करणे.लग्न समारंभात आहेर घेणे-देणे प्रथा बंद करणेबाबत चर्चा करणे.साखरपुडा पध्दत बंद करणे.नोकरी करणाऱ्या जावायाचा आग्रह न धरता व्यवसाय करणाºया तरुणास प्राधान्य देणे.विवाह वेळेवर लावणे व विवाह समारंभात सत्कार टाळणे.दरवर्षी जिल्हा पातळीवर वर-वधु परीचय मेळावा घेण.समाजातील वाढते वादविवाद व घटस्पोटाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हास्तरावर न्याय निवारण समिती स्थापन करणे.अंत्यविधी , दशक्रिया, उत्तरकार्य यातील रूढीत बदल करून कार्यक्रम साधारण करणे.विवाहात मानपान बंद करणे.मुलीच्या डिलिव्हरीच्या खर्चात मदत करणे.स्थळ पाहण्यासाठी नातेवाईकांचा खर्च कमी करणे.मेळावा यशस्वीतेसाठी संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळ भडगावचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरेंद्र महाले , मनोहर खोंडे , त्रिवेणी सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक संजय पवार , भरत चव्हाण यांनी केले. आभार हिलाल नेरपगारे यांनी मानले .