आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा परिषदेच्या अपंग एकात्मिक शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षक/परिचर यांच्या समायोजनासाठी झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी पथक (एसआयटी)ची स्थापना केली आहे. शिक्षण आयुक्तांसह चार जणांचा या समितीत समावेश असून समिती दोन महिन्यात चौकशी अहवाल मुख्य सचिवांना सादर करणार आहे.सन २००९-१० पासून अपंग एकात्म शिक्षण योजनेऐवजी केंद्र शासनाने अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) राबविली होती. अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिकस्तर बंद केल्याने या योजनेतील कार्यरत युनिटवरील ५९५ विशेष शिक्षकांना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक पदावर सामावून घेण्यात आले होते. या दरम्यान बोगस सह्या व खोट्या पत्रांच्या आधारे नियुक्ती देण्याचा प्रकार जळगाव जिल्हा परिषदेत समोर आला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची शासनाने २१ मे रोजी स्थापना केली.या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांची नियुक्ती केली आहे. तर समितीमध्ये सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक जय जाधव, ग्रामविकास विभागाचे उपसचिव गिरीश भालेराव व शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्रीधर शिंत्रे यांचा समिती समावेश आहे.समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अहवाल ६० दिवसांच्या आत मुख्य सचिवांना सादर करणार आहे.
जळगाव जिल्ह्यात अपंग युनिटच्या चौकशीसाठी एसआयटी पथकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:31 IST
शिक्षण आयुक्तांसह चौघांचा समावेश
जळगाव जिल्ह्यात अपंग युनिटच्या चौकशीसाठी एसआयटी पथकाची नियुक्ती
ठळक मुद्देदोन महिन्यात सादर होणार अहवालसमिती या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल मुख्य सचिवांना सादर करणार