शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावयाचे अर्ज, निवेदन मेलवर पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 21:16 IST

जळगाव -   जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही अधिकारी व कर्मचारी कोविड -19 विषाणूमुळे बाधित झालेले असल्यामुळे करोना विषाणू (कोव्हिड ...

जळगाव-  जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही अधिकारी व कर्मचारी कोविड -19 विषाणूमुळे बाधित झालेले असल्यामुळे करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून या कार्यालयाचे दिनांक 1 मार्च रोजीचे परिपत्रकान्वये शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे अभ्यांगतांची अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.त्याअनुषगाने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे त्यांचे कामासाठी अर्ज/निवेदने दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात न येता शक्यतो त्यांनी त्यांचे अर्ज/निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित शाखेच्या शासकीय ईझ्रमेलवर सादर करावेत.जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणारे सर्व टपाल हे केवळ सामान्य शाखा येथेच स्वीकारले जाईल. कोणतीही व्यक्ती / नागरीक टपाल देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही शाखेत/विभागात प्रत्यक्ष प्रवेश करणार नाही. केवळ अत्यंत तातडीच्या/महत्वाच्या विषयाबाबत अभ्यागतांना संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधून त्यांचे कामाच्या विषयाबाबत संबंधित विभाग प्रमुखांमार्फत पुढील कार्यवाही करता येईल.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबतचे निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून पूर्व निर्धारित वेळ घेवून केवळ 5 व्यक्तींनाच निवेदन सादर करता येईल. केवळ अत्यावश्यक/तातडीच्या विषयाबाबतच्या सुनावणीकरिता पक्षकारातर्फे केवळ एकच वकील हजर राहतील आणि जर वकीलांची नेमणूक नसेल तर केवळ वैयक्तिक पक्षकारच उपस्थित राहील, उर्वरित सर्व सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी नोंद घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात अनावश्यकरित्या येवून गर्दी करण्याचे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव